राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळील यशवंतगडावरून सरळ जाणारा रस्ता थेट आंबोळगड गावांत जातो. गावात शिरण्याअगोदर विस्तीर्ण सागरतीर नजरेसमोर पसरलेला दिसतो.

तालुका - राजापूर 

बस स्थानक - राजापूर 

रेल्वे स्थानक - राजापूर 

योग्य काळ - वर्षभर 

या ठिकाणी समुद्राने वेढलेल्या विस्तीर्ण जांभ्याच्या पठारावर श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. महाराजांचे भक्त या पवित्र आश्रमाला जरूर भेट देतात. आंबोळगडाच्या आश्रमात सुंदर दत्तमंदिर आहे. आश्रमाचा परिसर इतका शांत आहे की लगत असलेल्या सागराच्या रौद्रभीषण लाटांची गाजच फक्त परिसराची शांतता भंग करत राहाते.

आश्रमाच्या शांत परिसरात मागील बाजूला गगनगिरी महाराजांनी जिथे तपश्चर्या केली त्या गुहेला भेट देतां येते. इथे भेट दिल्यावर सुंदर निसर्गाविष्कारा बरोबरच एका तपोभूमीला भेट दिल्याचे समाधान मिळते. आंबोळगडाचा तुटलेला काळाकभिन्न कडा, विस्तीर्ण निळाशार समुद्र, खाडीमुखावरचा यशवंतगड हे सारे काही एका दृष्टीक्षेपांत न सामावणारे पण अविस्मरणीय असे आहे.

जवळील प्रेक्षणीय स्थळे - कणकादित्य मंदीर, महाकाली मंदीर, गोडवणे बीच, आर्यादुर्गा मंदीर व कातळशिल्पे, मुसाकाजी बंदर, यशवंत गड 

अनुभवण्यासारखे खूप काही

नितांत सुंदर जांभरूण

चला तर मग!

फुलपाखरे व कीटकजगत

चला तर मग!

पंखांवरचे भरारते जग

चला तर मग!
Positive SSL