बाणकोट किल्ला
मंडणगड
दुर्ग, वारसास्थळ
वर्णन
सावित्री नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर उभा असलेल्या या किल्ल्याला साहसी लोकांनी नक्की भेट दिली पाहिजे. सावित्री नदी, विस्तीर्ण अरबी समुद्र आणि आजूबाजूला दिसणारी हिरवीगार दृष्ये डोळ्याचे पारणे फेडतात. किल्ल्याचा इतिहास मोठा रंजक आहे. गुंतागुंतीच्या दगडी कोरीव कामासह किल्ल्याचे भग्नावशेषही पाहण्यासारखे आहेत. किल्ल्याचा पायथ्याशी छोटेसे गणेश मंदिर आहे. किल्ल्याचा उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ नगारखाना आहे. नगारखान्याचे प्रवेशद्वाराजवल सुंदर कोरीव दगडी पायऱ्या आहेत. इथून सावित्री नदीचे विहंगम दृश्य दिसते
वैशिष्ट्य
या किल्ल्याचा इतिहास खूप रंजक आहे. पोर्तुगीजांनी १५४८ मध्ये मोहम्मद आली शह यांच्याकडून हा किल्ला ताब्यात घेतला आणि पुढे सारखेल कान्होजी आंग्रे यांनी १७०० साली हा किल्ला जिंकला. पेशवे आणि आंग्रे यांच्यातील संघर्षामुळे पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन १७५५ मधे हा किल्ला ताब्यात घेतला. ब्रिटिशांनी या किल्ल्याला फोर्ट व्हिक्टोरिया असे नाव दिले. पुढे इंग्रजांनी हा किल्ला सांभाळणे आर्थिकृष्टया परवडत नाही असे सांगितले आणि म्हणून हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात देण्यात आला
सोयीसुविधा
जवळील गाव : बाणकोट
जवळील उपहारगृह : बाणकोट
जवळील रहाण्याची सोय : वेळास
मार्ग
बाणकोट गावाच्या पश्चिमेकडील टेकडीवरून ट्रेकिंगचा रस्ता सुरु होतो. आता गडापर्यंत अतिशय सुरक्षित आणि रुंद रस्ता आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत अर्ध्या तासात पोचता येते
नेटवर्क
उपलब्ध
सार्वजनिक स्वच्छतागृह
नाही
वाहनतळ व्यवस्था
मध्यम
परिसरातील व्यवसाय
No nearby Business found. Ask your friends nearby to register their businesses by clicking link below
अभिप्राय
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak 8
Posted on : 2022-08-09 09:50:09
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review 3
Posted on : 2022-08-09 08:46:40
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review
Posted on : 2022-08-09 08:42:26
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak
Posted on : 2022-08-08 23:39:55
Businesses nearby
No data was found
Images of nearby places captured by Visitors
No data was found