गोपाळगड अंजनवेल
गुहागर
दुर्ग, वारसास्थळ
वर्णन
हा किल्ल्यावरआल्हाददायकहवा असूनहा चहूबाजूंनी निळाशारसमुद्राने वेढलेला आहे.अंजनवेल हा दोन प्रवेशद्वार असलेला सागरी किल्ला आहे. एक दरवाजा पूर्वेला तर दुसरा पश्चिमेला. येथील निसर्गरम्य सौंदर्य अतुलनीय आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोक्याच्या जागी बांधलेल्या खोल्या त्या काळातील युद्धशास्त्रातील निपुणतेचे प्रतीक आहेत. किल्ल्यात आंब्याची बाग (आमराई) आहे. राजवाड्याची जीर्ण रचना विखुरलेले अवशेषांसह दिसते. छताशिवाय उरलेल्या भिंती आहेत. दालनाच्या वर असलेली कमान ही कुशल कारागिरीने युक्त असे वास्तुशास्त्रातील एक आश्चर्य आहे
वैशिष्ट्य
या भक्कम किल्ल्यावर अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले आहे. हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये जिंकला होता. नंतर तो याकुतखानच्या अधिपत्याखाली गेला. तुळाजी आंग्रे यांनी त्यांच्याकडून तो जिंकला आणि 1755 मध्ये त्याचे नाव गोपाळगड ठेवले. 1756 मध्ये तोपेशव्यांच्या अधिपत्याखाली आला. ऐतिहासिक महत्त्वाव्यतिरिक्तहा किल्ला प्रामुख्याने त्याच्या मोक्याच्या स्थानासाठी ओळखला जातो. या किल्ल्याची अधिक माहिती ‘अंजनवेलाची वहिवाट’ या पुरातन कागदपत्रात मिळते
सोयीसुविधा
जवळील गाव : अंजनवेल
जवळील उपहारगृह : अंजनवेल
जवळील रहाण्याची सोय : गुहागर
मार्ग
अंतिम ठिकाणापर्यंत जाण्याजोगारस्ता. पार्किंग पासून थोडेसे चालावे लागते. अंजनवेल गावाच्या पश्चिमेकडील टेकडीवरून ट्रेकिंगचा मार्ग सुरू होतो. आता गडापर्यंत अतिशय सुरक्षित आणि रुंद रस्ता आहे.किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी अर्धा तास लागतो
नेटवर्क
उपलब्ध
सार्वजनिक स्वच्छतागृह
नाही
वाहनतळ व्यवस्था
मध्यम
परिसरातील व्यवसाय
पर्यटकांनी काढलेली छायाचित्रे
No images uploaded by Visitor. Upload your own. Click button below
अभिप्राय
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak 8
Posted on : 2022-08-09 09:50:09
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review 3
Posted on : 2022-08-09 08:46:40
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sharvari Oak review
Posted on : 2022-08-09 08:42:26
" Very good restaurant. Great destinations. Beautiful beaches and greenery "
Review Submitted by :
Sarang Oak
Posted on : 2022-08-08 23:39:55
Businesses nearby
No data was found
Images of nearby places captured by Visitors
No data was found