२६ जानेवारी १९९८ या वर्षापासून महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक या राज्यांना जोडणारा कोकण रेल्वेचा प्रकल्प कार्यान्वित झाला. देशात कधी काळी अशक्यप्राय मानला गेलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तो अनेक आव्हानांना तोंड देऊनच. ’विसाव्या शतकातील भारतीय चमत्कार‘ असंच या रेल्वे मार्गाचं  वर्णन करावं लागेल. ताशी १६० किमी वेगाने धावणारी ही रेल्वे कोकणातील रोहा ते मंगलोर अशी सुमारे ७६० किमी लांबीचं अंतर पार करते. या रेल्वे मार्गावर सुमारे १८१९ छोटे-मोठे पूल व ५९२ लहानमोठे बोगदे असून यावरूनच हा प्रकल्प अभियंत्यांसाठी किती आव्हानात्मक होता ते लक्षात येतं.

डोंगरराजीत लपलेल्या मार्गावरून ‘कोकण राणी’ सोबतचा रेल्वेप्रवास तर कधी संपूच नये असं वाटतं. हिरव्या वाटा पार करत, डोंगरांना वळसे घालत, लांब बोगदे पार करत, खाड्या नद्यांवरचे पूल ओलांडत, टुमदार कोकणी गावातून जाणाऱ्या कोंकण रेल्वेचा प्रवास अनुभवावा असाच आहे. पावसाळयात हिरव्या गर्द डोंगरांवरून, असंख्य कोसळणारे शुभ्र धबधबे पाहात केलेला कोकण रेल्वेचा प्रवासतर आनंदाची पर्वणीच ठरतो.  कोकण रेल्वे वेळापत्रक

Positive SSL