नारळाच्या उत्पादनाबरोबरच रत्नागिरीत सुपाऱ्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. दापोली, गुहागर, रत्नागिरी येथे सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आढळते. घरांवर वाळत घातलेल्या नारंगी पिवळ्या सुपाऱ्या हे कोकणी वाड्यांचं एक खास वैशिष्ट्य आहे.

भारतीय संकृतीमधे शतकानुशतके सुपारी या फळाला अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. कुठल्याही मंगलकार्याची सुरुवात करताना सुपारीलाच श्री गणेश मानून तिची प्रतीकात्मक पूजा केली जाते. समारंभातील लज्जतदार भोजनानंतर रंगत वाढविणारे सुपारी घातलेले मसाल्याचे पान ही तर एक आवर्जून खाण्याची गोष्ट आहे. जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून खाल्ली जाणारी मसाला सुपारी घराघरांतून आढळते. अशा अनेक गोष्टी भारतीय संस्कृतीमध्ये सुपारीचे महत्त्व अधोरेखित करतात.

अनुभवण्यासारखे खूप काही

गोडवणे समुद्रकिनारा

चला तर मग!

जल क्रीडा

चला तर मग!

नितांत सुंदर जांभरूण

चला तर मग!
Positive SSL