विविध कोकणी व्यंजनांची लज्जत वाढवणारे मसाल्याचे पदार्थ हे खास कोकणाचे वैशिष्ट्य. मिरी, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, जायपत्री, लवंगा, वेलची, दगडफूल हे कोकणी मसाल्यातील खास पदार्थ शाकाहारी वा मांसाहारी पदार्थ लज्जतदार आणि चविष्ट बनवतात. कोकणातील सुगरणींच्या स्वयंपाकघरांत हे मसाल्याचे पदार्थ हमखास सापडतात. कोकणी वाड्यांतून नारळी पोफळींच्या आधाराने वर चढलेले मिरीचे वेल बघायला मिळतात.

जायफळाच्या आतील कठीण कवचातील बी म्हणजेच सुवासिक वासाचे जायफळ असते व बी भोवती असणारे आवरण वाळल्यावर जायपत्री बनते. दालाचिनीच्या झाडाच्या सालीला सुगंध असतो व तीच दालचिनी पदार्थांना सुगंधित बनवते. तमालपत्राचे पान हातावर नुसते कुस्करले तरी त्याचा घमघमाट सुटतो. अशा सुवासिक व उत्तम  पदार्थांमुळे कोकणी पदार्थ चवदार बनले नाहीत तरच नवल! त्यातून रत्नागिरीत अशा पदार्थांची रेलचेल असते. त्यामुळे परसातील झाडांवरून खुडून बनविलेल्या मसाल्याचे ताजे वाटण घातलेले पदार्थ आपल्यालाही ताजेतवाने बनवून जातात.

अनुभवण्यासारखे खूप काही

महालक्ष्मी मंदिर, केळशी

चला तर मग!

ओझरकडा धबधबा, राजापूर

चला तर मग!

रत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी

चला तर मग!
Positive SSL