बुरुड - कोकणात बांबू सगळीकडे आढळून येतो. इतक्या सहजपणे उपलब्ध असणाऱ्या या बहुगुणी वनस्पतीचा उपयोग तेथील स्थानिकांनी केला नाही तरच आश्चर्य! अतिशय लवचिक असलेल्या बांबूपासून अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ व मासळी इ. मालाची देवाणघेवाण करण्यासाठी व इतरही अनेक कामांसाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या टोपल्या बुरुड समाजातील लोक बनवतात व कोकणातील स्थानिकांची एक महत्वाची गरज भागवतात.

लोहार - शेतकरीबांधव शेतीच्या कामांसाठी शेतीच्या अवजारांवर अवलंबून असतात. रत्नागिरीतील स्थानिकांना विळे, कोयते, मोठाले सुरे, कुदळ, फावडी, घमेली अशा अनेक नित्योपयोगी शेती अवजारांची उपलब्धता करून देण्यात लोहार समाज कुशल आहे. नवीन अवजारे बनविणे, त्यांची दुरुस्ती करणे, सुरे, विळे अशा नित्योपयोगी वस्तू तयार करणे अशा अनेक सुविधा लोहार समाज पुरवित असल्याने कोकणवासी या कुशल कारागिरांवर खूप अवलंबून असतात.

पाथरवट - कोकणातील गृहीणीच्या स्वयंपाकघरात अतिआवश्यक असलेला पाटा-वरवंटा, खल-बत्ता तिला पाथरवटाकडे मिळतो. तिच्या अंगणातील सुबक तुळशीवृंदावन सुद्धा पाथरवटच तयार करून देतो. गरजेच्या वस्तूंबरोबरच अनेक कलाकुसरीच्या वस्तू बनविण्यात हे कारागीर कुशल असून हे अतिशय कष्टाचे काम ते पिढ्यानपिढ्या लीलया पार पाडत आले आहेत.

अनुभवण्यासारखे खूप काही

धारेश्वर धबधबा, मार्लेश्वर

चला तर मग!

होळी व शिमगोत्सव

चला तर मग!

स्कूबा डायाव्हिंग

चला तर मग!
Positive SSL