रत्नागिरीतील प्रमुख कृषी उत्पादन म्हणजे भात किंवा तांदूळ. येथील स्थानिक लोकांच्या आहारातील हा एक महत्त्वाचा घटक आहे. भाताच्या पिकासाठी पाऊस मोठ्या प्रमाणावर लागतो त्यामुळे सह्याद्रीलगतच्या खेड, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण इ.तालुक्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. रत्नागिरीतील स्थानिक जातीच्या भाताबरोबर कुळथाचं पिठलं किंवा कोकणी रश्श्याचा व सोलकढीचा घेतलेला आस्वाद तृप्त करून जातो.

त्याचप्रमाणे रत्नागिरीत डोंगरऊतारांवर नाचणी, वरई अशी पिकंही घेतली जातात. इथल्या लाल मातीत उगवणारे  कडवे वाल, डाळी, चवळी, कुळीथ अशा पिकांची चवच न्यारी! कोकणी पदार्थांच्या चवी वाढविणारे मिरी, दालचिनी, तमालपत्र, जायफळ, वेलची असे खास मसाल्याचे पदार्थसुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जातात.

अनुभवण्यासारखे खूप काही

गुहागर समुद्रकिनारा

चला तर मग!

वेत्ते समुद्रकिनारा

चला तर मग!

निसर्ग पर्यटन

चला तर मग!
Positive SSL