हापूसचा आंबा न आवडणारा मनुष्य तसा विरळाच! कोकणाचा राजा असलेला आंबा भारतात व भारताबाहेरही त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्हा हा खास हापूस आंब्यासाठी प्रसिध्द असून येथे सुमारे ६५,००० एकरांपेक्षा जास्त क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे व भारतातील सगळ्यात जास्त हापूस आंब्याचे उत्पादन हे रत्नागिरीत होते.

त्याचप्रमाणे रत्नागिरीत अनेक आंबाप्रक्रिया प्रकल्प असून आंब्याची अनेक उत्पादने भारतभर, युरोपीय व इतर देशांमध्ये निर्यात केली जातात. उन्हाळा सुरु होताच सुमधुर चवीच्या रत्नागिरी हापूसचे वेध कोकणवासीयांसकट सर्वांनाच लागतात. रत्नागिरीतील दमट व उष्ण हवामान आणि लाल माती आंब्याच्या भरपूर उत्पादनासाठी अनुकूल आहे. डोंगरउतार, जांभ्याचे सडे यांचबरोबरच इतरही अनेक ठिकाणी असणाऱ्या हिरव्यागार आमरायांतील सुट्ट्यांमधली सफर आंब्यांच्या मधुर चवीबरोबरच उन्हापासून शीतलताही मिळवून देते.

रत्नागिरी जिल्ह्यात अशा आमराया भरपूर आहेत. रत्नागिरी परिसर, लांजा, गुहागर, राजापूर येथे अनेक ठिकाणी आंब्याचे भरपूर उत्पादन होते व आंब्याच्या हंगामात ठिकठिकाणी `आंबा महोत्सव`भरवले जातात. वर्षातून मोजकेच दिवस मिळणारा आंबा मनसोक्त खाण्यासाठी उन्हाळ्यात रत्नागिरीला जायलाच हवं.

अनुभवण्यासारखे खूप काही

ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन

चला तर मग!

शाकाहारी

चला तर मग!

धनगरी नृत्य (गजा नृत्य )

चला तर मग!
Positive SSL