रत्नागिरी जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे असलेले विस्तीर्ण जांभ्याचे सडे. काळया कातळाच्या तुलनेने कमी कठीण असलेला हा खडकाचा प्रकार कोकणी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे.

जांभ्याच्या चिऱ्यांपासून बनलेली कोकणी घरे ही कोकणातल्या वातावरणात राहण्यासाठी अतिशय योग्य असतात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उंचसखल भागात चालत जाण्यासाठी बनवलेल्या चिऱ्यांच्या पाखाडी, नारळी पोफळीच्या बागांना असलेल्या ताली,  मंदिरे व घरांना असलेली भक्कम दगडी कंपाउंड या सर्व गोष्टींसाठी जांभ्याच्या दगडाचाच वापर केलेला दिसतो. जांभ्याच्या या सड्यांवर पावसाळयात उगवणारे गवताचे हिरवे ठोंब खूप सुंदर दिसतात. या विस्तीर्ण पठारांवर उगवणारी विविधरंगी फुले पाहाणे हा पावसाळयातील एक अविस्मरणीय अनुभव असतो.

जांभ्याच्या चिऱ्यांना कोकण आणि इतर ठिकाणांहून असलेल्या प्रचंड मागणीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिऱ्याच्या खाणी दिसतात. अतिशय मोजक्या यंत्रांचा वापर करून खाणीतून चिरे काढायचा हा व्यवसाय अनेक वर्षांपासून इथे चालत आला आहे.     

अनुभवण्यासारखे खूप काही

याकूतबाबा दर्गा, केळशी

चला तर मग!

खेडची लेणी

चला तर मग!

व्हॅली क्रॉसिंग

चला तर मग!
Positive SSL