रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण किनाऱ्यावर मासेमारी चालते मात्र येथील मासेमारीची ३ प्रमुख बंदरे म्हणजे रत्नागिरीचे मिऱ्या बंदर, दापोली तालुक्यातील हर्णे बंदर आणि राजापूर तालुक्यातील नाटे बंदर. पावसाळा संपत येताच साधारण सप्टेंबर महिन्यापासून या बंदरांवरून मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय सुरु होतो. समुद्रामध्ये मासेमारीला जाण्यासाठी खूप मोठी तयारी लागते.

मोठाल्या ट्रॉलर्सवर मासेमारीसाठी लागणाऱ्या अजस्त्र जाळ्यांची सर्वप्रथम डागडुजी केली जाते. हे सर्व काम  हातानेच करतात. तुटलेल्या जाळ्या निट करणारे कारागीर सर्वत्र जाळ्यांची दुरुस्ती करण्यात गुंतलेले असतात. त्यानंतर ही महाकाय जाळी बोटीवर चढविली जातात. हे मोठे ट्रॉलर्स ३ ते ५ दिवस तर कधी कधी ८-८ दिवस समुद्रावर राहातात. पकडलेली मासळी खराब होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात बर्फ बरोबर न्यावा लागतो.

येथे रोज सायंकाळी भरणारा प्रचंड मोठा मच्छी बाजार बघण्यासारखा असतो. शेकडो बोटी रोज मासेमारी करून येतात. येथे माशांचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. माशांचा बोली लावून लिलाव केला जातो. पर्यटकसुध्दा मोठ्या हौसेने ताजी मासळी खरेदी करून घेऊन जातात. छोटे मोठे व्यापारी येथे मासे खरेदी करून ती मासळी पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, कर्नाटक अशा वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करतात. इथे मिळणाऱ्या ताज्या आणि भरपूर मासळीमुळे रत्नागिरीच्या मासळीला राज्यातून मोठी मागणी असते.

अनुभवण्यासारखे खूप काही

धूतपापेश्वर मंदिर, राजापूर

चला तर मग!

महालक्ष्मी मंदिर, केळशी

चला तर मग!
Positive SSL