प्रखर क्रांतिकारक, सेनानी, विचारवंत, प्रभावी लेखक व कवी अशा अनेक बिरुदावली मिरविणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रत्नागिरीचं एक अनमोल रत्न. रत्नागिरी शहरातील पतितपावन मंदिराच्या परिसरांत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे हे प्रेरणादायी स्मारक उभारण्यात आले आहे.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - रत्नागिरी

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - वर्षभर 

या स्मारकाच्या पहिल्या मजल्यावर ‘गाथा बलिदानाची’ ही प्रदर्शनी असून १८५७ च्या स्वातंत्र्य समरापासून ते स्वातंत्र्याच्या काळापर्यंतचे देशभक्त, क्रांतिकारक, हुतात्मे यांचा स्फूर्तिदायी,  त्यागमय व तेजस्वी इतिहास दालनांमधून मांडण्यात आला आहे. वीर सावरकरांच्या ज्या वस्तूंनी इतिहास घडवला ती सावरकरांनी लंडनहून पाठवलेली दोन पिस्तुले, त्यांची काठी, जंबिया, व्यायामाचे मुद्गल अशा अनेक गोष्टी पाहून बाहू स्फूरण पावतात.

मार्सेलीस बंदरावर ज्या बोटीतून सावरकरांनी मायभूमीच्या ओढीने समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली, त्या ‘मारिया’ बोटीची प्रतिकृती इथे ठेवली आहे. तळमजल्यावरील सभागृहात माहितीपटांद्वारे सर्वांना थोर नररत्ने व इतरही अनेक गोष्टींची माहिती देण्यात येते. या स्मारकाला स.१० ते १२ व सायं ४ ते ६ या वेळेत भेट देता येते.

अनुभवण्यासारखे खूप काही

खोरनिनको धबधबा, लांजा

चला तर मग!

श्री चंडिकादेवी मंदिर, दाभोळ

चला तर मग!

गरम पाण्याचे झरे, राजवाडी

चला तर मग!
Positive SSL