आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत ऊर्फ श्री. कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म १३० वर्षांपूर्वी १८८६ साली मालगुंडला झाला. गणपतीपुळ्यापासून अवघ्या २ किमी अंतरावर असलेल्या मालगुंड येथे `कोकण मराठी साहित्य परीषदेने` कवी केशवसुत यांचं स्मारक उभारलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कुसुमाग्रज यांनी या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी ‘हे स्मारक म्हणजे मराठी कवितेचं तीर्थक्षेत्र, तर मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे,’ असे गौरवोद्गार काढले आहेत.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - गणपतीपुळे

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - वर्षभर 

आद्य कवी केशवसुत यांनी आपल्या ३९ वर्षांच्या अल्पायुष्यात लिहिलेल्या १०३ कविता मराठी साहित्यात अजरामर झाल्या असून, त्यांचे मोल अपूर्व आहे. उदरनिर्वाहासाठी केशवसुतांनी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली परंतु कविता व काव्य त्यांच्या रोमारोमांत भिनले होते. काव्य म्हणजे केशवसुत व केशवसुत म्हणजे काव्य असे म्हंटले तर वावगे ठरू नये. त्यांच्या `तुतारी’, `नवा शिपाई’ या कविता विशेष प्रसिद्ध आहेत.

केशवसुत हे मराठी साहित्यिकांना व कवींना कायमच प्रेरणास्थानी राहिलेले आहेत. १९०५ साली त्यांचा मृत्यू झाला परंतु आजही त्यांच्या मूळ कौलारू घरातील स्मारकात केशवसुतांच्या अनेक वस्तू, शंभर वर्षांपूर्वीची तांब्या पितळ्यांची भांडी जतन केली आहेत. त्यातील पंचपाळे, तस्त, मूदपात्र अशा शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वी वापरात असलेल्या परंतु आता कालबाह्य झालेल्या वस्तू आवर्जून पाहण्यासारख्या आहेत.

जवळची प्रेक्षणीय स्थळे - जयगड, गणपतीपुळे मंदीर आणि बीच, आरे वारे बीच, प्राचीन कोकण, वॅॅक्स म्युझियम 

अनुभवण्यासारखे खूप काही

महाकाली मंदिर, आडिवरे

चला तर मग!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

चला तर मग!

प्रसिद्ध व्यक्ती

चला तर मग!
Positive SSL