भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक या गावात उभारण्यात आले असून त्यांच्या वडिलोपार्जित घराचेच स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. मंडणगडपासून १८ कि.मी. अंतरावर आंबडवे गावाला पाचरळ फाट्याहून रस्ता आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तत्कालीन कॉंग्रेस सरकारने भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून आमंत्रित केले. २९ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याच्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली.

तालुका - मंडणगड

बस स्थानक - मंडणगड

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - वर्षभर 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात व दलितांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अलौकिक योगदान आहे. आंबडवे या त्यांच्या मूळ गावी या महान व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे स्मारक उभे करण्यात आले आहे. हा परिसर रम्य असून स्मारक परिसरांत व वास्तूमधे बाबासाहेबांच्या वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

बुधल सडा

चला तर मग!

सोमेश्वर मंदीर – राजवाडी

चला तर मग!

लाडघर समुद्रकिनारा

चला तर मग!
Positive SSL