इतिहासात प्रत्येक काळांतील राज्यकर्त्यांनी राज्याच्या सीमा समुद्राला भिडलेल्या असताना त्यांच्या संरक्षणासाठी आरमाराचे अपार महत्त्व ओळखले होते. म्हणूनच समुद्रात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांवर अनेक शतकांपासून जलदुर्ग सागराचे व समुद्रीतटांचे रक्षण करत उभे आहेत. कोकणातील समुद्रीतटांचे रक्षणकर्ते असणारे `आंग्रे` कुटुंब म्हणजे समुद्राचे राजेच होत. अनेक शतकं आंग्र्यांच्या कित्येक पिढ्यांनी पराक्रम गाजवून समुद्राचे व किनाऱ्यांचे रक्षण केले आहे.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - सप्टेंबर ते मे

बोटीने किल्ल्याजवळ गेल्यावर मुख्य दरवाजापासून १०० मीटर अंतरावर समुद्राजवळ तुरळक तटबंदी व एक भग्न दरवाजा दिसतो. त्यापुढे अंदाजे ३० फूट उंच असे दोन भक्कम बुरूज व त्यामधून दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. मुख्य दरवाजा आजही सुस्थितीत असून फारच सुंदर दिसतो. दरवाजाची फार काही पडझड झाली नसून दरवाजावरील कमानदेखील पूर्णावस्थेत आहे. दरवाजावर अनेक शिल्पाकृती पाहायला मिळतात.

गडाला ४ फूट उंचीचा एक उत्तम स्थितीतला चोरदरवाजा असून त्याच्या पायऱ्या उतरून गेल्यावर एक वाट समुद्रातील बुरुजांकडे जाते.

गडाच्या पश्चिमेकडील हे बुरूज २५-३० फूट उंच, रांगेत उभे असलेले हे २४ बुरुज एखाद्या माळेत ओवल्यासारखे दिसतात.

आपल्या स्थलमहात्म्यासाठी प्रसिद्ध असणारा सुवर्णदुर्ग हा कोकणातील महत्त्वाचा जलदुर्ग आहे. दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ किनाऱ्यापासून अडीचशे मीटर अंतरावर समुद्रात आठ एकरवर हा किल्ला वसला आहे. हर्णे बंदरापासून बोट ठरवून गेल्यास किल्ल्यावर ३० मिनिटांतच पोहोचता येते. पावसाळा संपल्यावर जानेवारीच्या सुमारास गेल्यास किल्ल्यावर गवत कमी असते.

छत्रपतींकडून `सरखेल` ही आरमारातील मानाची पदवी प्राप्त करणारे कान्होजी आंग्रे या सर्वांत अग्रणी होते. इ.स. १६४०च्या सुमारास कान्होजी आंग्र्यांचे वडील तुकोजी आंग्रे हे शहाजीराजांकडे होते. निजामशाही संपल्यावर दक्षिण कोकणामधील हा भाग आदिलशाहीत आला. त्यानंतर सुवर्णदुर्गावर शिवाजीमहाराजांनी लगेचच विजय मिळवला. मात्र किल्ल्यावरील तुरळक तटबंदी ही त्याआधी निजामाच्या काळात बांधली गेली असावी. नंतर मात्र इ.स. १६६९ मध्ये व त्यानंतरही मराठी आरमाराकडून सुवर्णदुर्गाची व्यवस्थित दुरुस्ती केली गेली व किल्ल्याचे महत्त्व वाढीस लागले. इ.स. १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे मराठी आरमाराचे मुख्य अधिकारी झाल्यावर आरमाराच्या छावण्या सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग येथे स्थापण्यात आल्या होत्या. इ.स. १७३१ पर्यंत कोणतीही लढाई न होता सुवर्णदुर्ग पेशव्यांच्या ताब्यात होता. अखेर कर्नल केनेडी या इंग्रज अधिकाऱ्याने इ.स. १८१८ मध्ये पेशव्यांकडून किल्ला जिंकून घेतला.

अनुभवण्यासारखे खूप काही

मल्लिकार्जुन मंदीर

चला तर मग!

सुवर्णदुर्ग, दापोली

चला तर मग!

राजापूरची गंगा

चला तर मग!
Positive SSL