रत्नागिरी शहरात रत्नागिरी बंदराजवळ रत्नदुर्ग किंवा भगवती किल्ला १२व्या शतकापासून उभा आहे. रत्नागिरीच्या पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर सुमारे १२११ मीटर लांब व ९१७ मीटर रुंद असणारा हा अवाढव्य किल्ला १२० एकरांवर पसरला आहे. त्याच्या बालेकिल्ल्याला ९ बुरुज असून संपूर्ण किल्ल्याला एकूण २९ बुरुज आहेत. किल्ला पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन भागांत विभागला आहे. किल्ल्याच्या तीनही बाजूंना समुद्र तर एका बाजूला दीपगृह असल्याने हा परिसर खूपच नयनरम्य दिसतो. पायथ्यापासून १०० मीटर उंचीवर असलेला रत्नदुर्ग चढायला सोपा असून वाहनमार्ग थेट भगवतीच्या मंदिरापर्यंत जातो.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - रत्नागिरी

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - वर्षभर 

रत्नदुर्ग किल्ल्याचा दुसरा भाग म्हणे दीपगृह. किल्ल्याच्या उजवीकडचा उतार थेट कोळी वस्तीतून भगवती बंदराकडे जातो, तर डावीकडचा रस्ता थेट दीपगृहाकडे जातो. या रस्त्यावर डाव्या हाताला एका छोट्या घुमटीत रतनगिरी बाबांची समाधी आहे व त्यांच्यावरून या किल्ल्याला रत्नदुर्ग हे नाव पडले असावे असे स्थानिक सांगतात. दीपगृहावर जाण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. दीपगृहाशेजारील बुरुजावर चार तोफा ठेवल्या असून त्यापैकी दोन तोफा ४ फूट लांबीच्या तर दोन तोफा अंदाजे १२ फूट लांबीच्या आहेत.

गडाचा तिसरा भाग म्हणजे भगवती देवीचे मंदिर. गडाच्या या बालेकिल्ल्यात नूतनीकरण केलेली भक्कम तटबंदी असून त्यात अकरा बुरुज बांधलेले आहेत. गडाचा हा परिसर समुद्रापासून सुमारे २०० फूट उंचीवर आहे. मंदिरापर्यंत गाडीने जाता येते व तिथून पायऱ्या चढून दरवाजाजवळ पोहोचता येते. भगवती मंदिराचा परिसर ही गडावरील सगळ्यात मोठी वास्तू असून मंदिर परिसराचा दरवाजा सकाळी ८ ते संध्या.६ वाजेपर्यंत उघडा असतो.

रत्नदुर्ग हा बहमनी काळात बांधला गेला आहे. त्यानंतर पुढे इ.स.१६६० पर्यंत तो आदिलशाहीत होता. १६७० च्या सुमारास शिवाजीमहाराजांनी कोकणातील अनेक किल्ले स्वराज्यात आणले त्याचबरोबर हा किल्लादेखील स्वराज्यात सामील झाला. १७५५ मधे रत्नदुर्ग आंग्रें यांच्या ताब्यात होता, तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता. १९५० मधे भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन १९८९ मधे या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. अनेक शतकं रत्नागिरी परिसराचा राखणदार व अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या या किल्ल्याला भेट दिल्यावर एखाद्या जाणकार बुजुर्गाला भेटल्याची अनुभूती आपल्याला येते. हा किल्ला त्याच्या उंचीवरून दिसणाऱ्या मोहक परिसरासाठी तेवढाच प्रसिद्ध आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

मुरूड समुद्रकिनारा

चला तर मग!

बुधल सडा

चला तर मग!

खेडची लेणी

चला तर मग!
Positive SSL