सह्याद्रीच्या दुर्गम भागांत त्याच्या माथ्यावर अनेक डोंगरी किल्ले शेकडो वर्षांपासून वसले आहेत. रसाळगड पावसाळ्यात खूप सुंदर भासतो. गडाच्या माथ्यावरून पूर्वेकडे सह्याद्रीची लांबवर पसरलेली रांग, पश्चिमेकडे पालगड, दक्षिणेकडे जगबुडी नदीचे खोरे, मधुमकरंद गड असा परिसर नजरेत भरतो. इथूनच पुढे सुमारगड, महिपतगड अशी सफरही करता येते.

तालुका - खेड

बस स्थानक - खेड

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - सप्टेंबर ते फेब्रुवारी

जुना दरवाजा पूर्णपणे उतरवून आता तिथे नवीन दरवाजा बांधला आहे. या उत्तराभिमुख दरवाज्यातून पायऱ्या चढून जाताना वाटेत हनुमानाची मूर्ती दिसते. या मूर्तीच्या कमरेला शौर्याचे प्रतिक असलेला खंजीर असून मूर्तीच्या ओठावर मिशीदेखील आहे.

पुढे चालत गेल्यावर गडावरील झोलाई मंदिराच्या मागे तटावर ब्रिटीश बनावटीच्या दोन तोफा आहेत. झोलाई मंदिराचा परिसर रम्य आहे. मंदिरात झोलाई देवी, शिवपार्वती, भैरव, नवचंडी अश्या अनेक मूर्ती मांडून ठेवल्या आहेत. मंदिर पेशवेकालीन असून येथे दोन वर्षातून एकदा यात्रा भरते. मंदिरासमोर भव्य दिपमाळ असून तेथून पुढे गेल्यावर पूर्व टोकाकडे वैशिष्ट्यपूर्ण असे खांबटाके आहे. टाक्याजवळ एक तोफ असून टाक्याच्या खांबावर श्री गणेशाची प्रतिमा आणि उत्तम कोरीवकाम केलेले आढळते. या खांबांच्या कोरीवकामावरून हे टाके किल्ला बांधायच्या आधीपासून अस्तित्वात होते असे निश्चितपणे सांगता येते.

जवळची प्रेक्षणीय स्थळे - दापोली, मंडणगड, पान्हाळेकाजी लेणी, उन्हावरे गरम पाण्याची कुंडे

शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत रसाळगड दुरुस्त केला गेला असावा असे अभ्यासकांचे मत आहे. त्या काळात गडावर मोठी लढाई किंवा एखादी ऐतिहासिक घटना झाल्याची नोंद मिळत नाही. पावसाळ्यात भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी रसाळगड हा एक उत्तम पर्याय आहे. पर्जन्य ऋतुमधे रसाळगडाचे सौंदर्य खूप उठून दिसते. गर्द धुक्याने वेढलेल्या गडावरील वास्तू गुढरम्य भासतात.

खेडपासून भरणेनाका-तळे-बौद्धवाडी-निमाणी असा रस्ता पार केल्यावर २२ किमी अंतरावर `रसाळगड` हा किल्ला आहे. स्वतःच्या गाडीने निमाणीपासून पुढे २ कि.मी. अंतरापर्यंत गाडीने जाता येऊ शकते. मात्र एस. टी. ने गेल्यास निमाणीपर्यंतच जाता येते व तिथून पुढे पायी जावे लागते.रसाळगडाची उंची पायथ्यापासून ३०० मीटर इतकी असून निमाणी ते पेठ हे अंतर पाऊण तास तर पेठ ते रसाळगड माथा हे अंतर चढून जाण्यासाठी अर्धा तास लागतो. किल्ल्याचा विस्तार फारसा नसून तो ५ एकरावर पसरलेला आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन

चला तर मग!

सुपारी (पोफळी)

चला तर मग!
Positive SSL