मंडणगड एस.टी.स्थानकापासून मंडणगड किल्ला ४ ते ५ कि.मी. अंतरावर वसला आहे. रत्नागिरीतील सर्वात प्राचीन किल्ला म्हणून या किल्ल्याचा उल्लेख केला जातो.

तालुका - मंडणगड

बस स्थानक - मंडणगड

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - सप्टेंबर ते फेब्रुवारी 

किल्ल्यावर वरपर्यंत वाहन जाण्यासाठी उत्तम डांबरी सडक आहे. या किल्ल्याची उभारणी १२ व्या शतकात पन्हाळ्याचा राजा भोज याच्या कारकिर्दीत झाली असावी. किल्ल्याची पडझड झाली असली तरी आजही त्याचे काही अवशेष गडावर पहायला मिळतात.

मंडणगड किल्ल्यावर दोन सुंदर तलाव असून त्यांच्या भोवती कुलपाच्या आकाराचे वैशिष्ट्यपूर्ण दगड आहेत. तिथे असलेली कबर ही शिवाजीमहाराजांचा एकनिष्ठ सेनानी दर्यावर्दी दौलतखान याची असावी असे म्हणतात. डोंगराच्या माथ्यावर वसलेला हा किल्ला `गिरीदुर्ग` या प्रकारांत मोडणारा आहे. या किल्ल्याची तटबंदी ८ एकर क्षेत्रात पसरली असून इथून दिसणाऱ्या परिसराचे दृष्य अत्यंत मनोहारी असते.

अनुभवण्यासारखे खूप काही

गरम पाण्याचे झरे, राजवाडी

चला तर मग!

आर्यादुर्गा मंदिर

चला तर मग!

महाकाली मंदिर, आडिवरे

चला तर मग!
Positive SSL