चिपळूणपासून अगदी जवळ म्हणजे २ ते ३ कि.मी. अंतरावर एका सुंदर ठिकाणी गोवळकोट ऊर्फ गोविंदगड हा गिरिदुर्ग वशिष्ठी खाडीच्या तीरावर उभा आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी करंजेश्वरी देवीचे मंदिर आहे तर किल्ल्याला उत्तरेकडून वशिष्ठी नदीने आणि दक्षिण दिशेने वाटोळी नदीने विळखा घातला आहे. गोवळकोट किल्ल्याच्या तीनही बाजूंनी पाणी असून जवळच गोवळकोट बंदर आहे. किल्ल्यावर इ.स.१८६२ साली २१ तोफा होत्या असे म्हणतात.

तालुका - चिपळूण

बस स्थानक - चिपळूण

रेल्वे स्थानक - चिपळूण

योग्य काळ - वर्षभर 

करंजेश्वरी मंदिराजवळील पायऱ्या चढून गेल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी समोर दोन बुरूज व त्यामध्ये दरवाजाची जागा दिसते. परंतु आज तिथे किल्ल्याचा दरवाजा, त्याचे खांब व कमान यांच्या फक्त खुणाच  शिल्लक आहेत.

बुरुजावरून तटबंदीला फेरा मारत असताना नदीचे पात्र उजवीकडे राहाते जे वरून खुपच विहंगम दिसते. तटावरून चालताना वशिष्ठी नदीवरील बंदर दृष्टीस पडते. वाटेतील टेकडीला वळसा घालून गेल्यावर दक्षिणेकडील तटबंदीजवळ विंझाई देवीचे आधुनिक पद्धतीने जीर्णोध्दार केलेले मंदिर आहे. या मंदिराबाहेर एका घुमटीमध्ये जी एक मूर्ती आहे, ती रेडजाईची मूर्ती आहे असे स्थानिक सांगतात. गडावर वास्तव्य करणारे स्थानिक या  देवतांना फार पुरातन काळापासून पूजत आले आहेत. अनेक गडांवर अशा देवतांचं अस्तित्व आढळून येतं ज्यांना गडाचे रक्षणकर्ते मानलं जातं.

पायथ्यापासून हा किल्ला ६० मीटर उंच असून करंजेश्वरी देवीच्या मंदिराशेजारून पायऱ्या चढून २० मिनिटांत गडावर पोहोचता येते. गडावरून नदीचा परिसर व तिच्या पात्रातील बेटं खूप सुंदर दिसतात. गोवळकोट ऊर्फ गोविंदगड हा जंजिऱ्याच्या सिद्दीने इ.स.१६९० साली बांधला असावा असे म्हणतात. मात्र शिवाजीमहारांजानी हा किल्ला बांधला असेही काही अभ्यासकांचे मत आहे. नंतरच्या काळात मात्र या किल्ल्यावर आंग्रे व इंग्रजांची सत्ता  होती असे पुरावे संशोधकांना आढळून आले आहेत. वशिष्ठी नदीच्या खाडीमुखावरील गोवळकोट हा किल्ला खाडीतून होणाऱ्या जलवाहतुकीतील जकात वसुलीचं ठाणं असावा असा अंदाज आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

चुना कोळवणचा धबधबा, राजापूर

चला तर मग!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

चला तर मग!

निवळीचा धबधबा, रत्नागिरी

चला तर मग!
Positive SSL