सागरीदुर्ग या प्रकारात मोडणारा हा किल्ला सात एकर परिसरावर पसरलेला असून किल्ल्याचा परिसर खूप सुंदर आहे. गडाला पूर्वेकडे व पश्चिमेकडे असे दोन दरवाजे असून  गडाला जमिनीकडील बाजूस खंदक आहे. दक्षिणेकडील तटबंदी फोडून तिथे येण्याजाण्यासाठी वाट केली आहे. आत गेल्यावर देवड्या दिसतात व दरवाज्याची कमान आजही तग धरून आहे.

तालुका - गुहागर

बस स्थानक - गुहागर

रेल्वे स्थानक - चिपळूण

योग्य काळ - सप्टेम्बर ते मे

अंजनवेल मोक्याच्या ठिकाणावर वसला असल्याने अनेक सत्ताधारी त्याचे महत्व ओळखून होते. इ.सं.१७५५ रोजी तुळाजी आंग्रे यांनी याकूतखानाकडून अंजनवेल किल्ला जिंकून त्याचे गोपाळगड असे नामकरण केले. मात्र त्यापूर्वी १६६० पर्यंत किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता तर शिवाजी महारांजानी तो नंतर जिंकून घेतला. संभाजी महाराजांनी त्याची डागडुजी केली मात्र नंतर तो सिद्दी खर्यातखान याच्याकडे १६९९ मध्ये गेला. अखेर इ.सं.१७५६ मध्ये गोपाळगड पेशवाईत सामिल झाला.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर आमराई नजरेस पडते. डावीकडे तटावर चढण्यासाठी पायऱ्या बांधल्या असून आजही किल्ल्याची तटबंदी भक्कम आहे. दरवाजावरील तटबंदीवरून फेरफटका मारताना समोरचा समुद्र, आसपासची हिरवाई मन मोहून टाकते. पुढे गेल्यावर दक्षिणेकडे १०० मीटर चालत गेल्यावर एका वाड्याचे अवशेष दिसतात. त्याच्या भिंती सुस्थितीत आहेत. गडाच्या भक्कम बुरुजांवरून समुद्र बघत एकांतात मारलेला फेरफटका दीर्घ काळ स्मरणात रहातो.

गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावाच्या उत्तरेस गेल्यावर समुद्राच्या भूशिरावर अंजनवेल किंवा गोपाळगड हा किल्ला दिसू लागतो. गुहागरपासून १८ किमी. अंतरावर अंजनवेल आहे. रत्नागिरी उर्जा प्रकल्पापासून अंजनवेल गाव ६ किमी वर आहे.  तर अंजनवेल गावापासून किल्ला फक्त २ किलोमीटर वर आहे. खासगी वाहनाने किल्ल्यापर्यंत जाता येते.त्याचप्रमाणे वेलदूर पासून बोटीनेही किल्ल्यावर जाता येते. किल्ला खासगी मालकीचा आहे परंतू तो पाहण्यास काही अडचण येत नाही. समुद्रसपाटीपासून अंजनवेल ६५ मीटर उंच असून चढण सोपी आहे.

गोपाळगड उर्फ अंजनवेल या किल्ल्याची व त्या काळातील घडामोडींची माहिती `अंजनवेलची वहिवाट` या मोडी कागदपत्रांत लिहिलेली आहे. गडाच्या माथ्यावरून दाभोळ प्रकल्प, वेलदूर, रत्नागिरी पॉवर प्रकल्प, जवळचे दीपगृह आदी परिसर दिसू शकतो.

अनुभवण्यासारखे खूप काही

पूर्णगड, रत्नागिरी

चला तर मग!

आंजर्ले समुद्रकिनारा

चला तर मग!

मूर्ती कला

चला तर मग!
Positive SSL