वेसवी गावापासून बाणकोट किल्ला ३ कि.मी. अंतरावर आहे. समुद्रातील भूशिरावर असणाऱ्या या किल्ल्याचा परिसर छोटा असून हा किल्ला शिलाहार राजवटीत बांधला असावा असा अंदाज आहे..

तालुका - मंडणगड

बस स्थानक -वेळास

रेल्वे स्थानक -खेड

योग्य काळ - वर्षभर 

किल्ल्याची संरक्षक तटबंदी व बुरुज आजही टिकून आहेत. मुख्य दरवाज्यावर गणेशपट्टी आहे. किल्ल्यापासून काही अंतरावर सावित्री नदी वाहते व हीच नदी बाणकोटची खाडी म्हणून प्रसिध्द आहे.

प्लिनी या ग्रीक ग्रंथकाराने पहिल्या शतकात या किल्लाचा उल्लेख ‘मंदगीर’ म्हणून केला होता. पोर्तुगीजांकडून मराठ्यांकडे आल्यावर या किल्ल्याचे ‘हिंमतगड’ म्हणून नामकरण झाले. इंग्रजांनी आंग्र्यांकडून हा किल्ला ताब्यात घेतल्यावर त्याचे ‘व्हिक्टोरिया` असे नामकरण केले होते. डोंगरावर उंचीवर वसलेल्या या किल्ल्यावरून अथांग पसरलेल्या खाडीचे व पलीकडील हरिहरेश्वरच्या डोंगराचे विहंगम दृश्य दिसते.

अनुभवण्यासारखे खूप काही

सुपारी (पोफळी)

चला तर मग!

मूर्ती कला

चला तर मग!

शाकाहारी

चला तर मग!
Positive SSL