रत्नागिरीची खाद्यभ्रमंती मत्स्याहाराशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. मत्स्यप्रेमींसाठी इथे विविध प्रकारची ताजी मासळी, कोळंबी, चिंबोरी, तिसऱ्या, झिंगे यांच्या रुचकर सागुतीसह खास कोकणी मसाले वापरून बनवलेले चिकन व कोंबडीवडे यांच्याबरोबर विविध रस्से व सोलकढी यांचा मनसोक्त आस्वाद घेता येतो.

कोकणातील अतिशय अप्रतिम चवीची सोलकढी पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही असा मनुष्य शोधून सापडणार नाही. कोकणी भाषेत ज्याला `आगळ` म्हणतात अशा आमसूल किंवा कोकमाच्या आंबट रसात नारळाचे गोड दूध घालून बनविली जाणारी सोलकढी जेवढी सुंदर दिसते त्याहूनही ती अधिक सुंदर लागते. तृष्णा भागविणारी, थकवा घालवणारी, पचनास उपयुक्त, रसना तृप्त करणारी सोलकढी हे कोकणवासियांबरोबरच इथे येणाऱ्या पर्यटकांनाही हवेहवेसे वाटणारे पेय आहे. आजकाल तिच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कोकणाच्या सीमारेषा उलांडून ठिकठीकाणी शितपेयांप्रमाणे थंडगार `पॅकबंद` सोलकढी मिळू लागली आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या सोलकढीची आठवण झाली की ती अगदी आपल्या राहत्या घराजवळही मिळू शकते.

अनुभवण्यासारखे खूप काही

जांभा खाण

चला तर मग!

महर्षी कर्वे स्मृती स्मारक, मुरुड

चला तर मग!
Positive SSL