भारतीय परंपरेत आदिशाक्तीला पूजण्याची प्रथा शतकानुशतके जपलेली आहे. उमा, पार्वती, गौरी, दुर्गा, महाकाली, चंडिका अशा विविध रूपातील देवींची मंदिरे आपल्याला अनेक ठिकाणी स्थापन केलेली दिसतात.

रत्नागिरी जिल्ह्यातही केळशी येथील महालक्ष्मी, रत्नागिरी शहरातील भगवती देवी, आडिवरे येथील महाकाली, तुंबरव येथील शारदादेवी आणि गुहागर मधील दुर्गादेवी मंदिर अशा अनेक लहान-मोठ्या मंदिरातून घट बसवले जातात आणि शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होते. मंदिरांना सुंदर सजवले जाते व दिव्यांची नेत्रदीपक रोषणाई केली जाते. रोज भजन, कीर्तन, गोंधळ याबरोबरच पारंपरिक जाखडी नृत्यही ठिकठिकाणी सादर केले जाते. या व्यतिरिक्त अनेकांकडे घरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला शहरांमधून लुप्त झालेली घागरी फुंकायची प्रथा आजही रत्नागिरीत अनेक ठिकाणी बघायला मिळते. सर्व समाजाला एकत्र आणणारा रत्नागिरीतील हा अनोखा नवरात्रोत्सव कला, परंपरा, संस्कृती यांचे एकत्रित दर्शन घडविणारा आहे.

स्त्री शक्तीचा जागर असणाऱ्या या उत्सवात देवीच्या समोर मातीचे जाड थर बनवून त्यामध्ये धान्य पेरले जाते. देवी म्हणजे माता किंवा जननी. नवनिर्मितीचे प्रतीक असलेली आदिशक्ती ही समाजातील असुर म्हणजेच वाईट शक्तींचा नाश करणारी आणि सत्प्रवृत्तींचे जतन करणारी आहे असे मानले जाते.

अनुभवण्यासारखे खूप काही

परशुराम स्मारक

चला तर मग!

श्री चंडिकादेवी मंदिर, दाभोळ

चला तर मग!

लाडघर समुद्रकिनारा

चला तर मग!
Positive SSL