होळी आणि गणेशोत्सव हे कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणारे सण. हिवाळा ऋतू संपता संपता उन्हाळ्याची चाहूल देणारा होळी सण अर्थात शिमगोत्सव रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. समाजातील वाईट गोष्टी अग्निदेवतेच्या स्वाधीन करून त्या जाळून त्यांचे निर्दालन करणे हा होळी सणामागचा मूळ हेतू आहे.

रत्नागिरीमध्ये होळी सण खूप वेगळ्या पध्दतीने साजरा होतो. सर्वसाधारणपणे आठ दिवस हा शिमगोत्सव सर्वत्र केला जातो. काही ठिकाणी पालख्या नाचवल्या जातात तो सोहळाही बघण्यासारखा असतो. गावातील सर्व गावकरी एकत्र येऊन प्रचंड उत्साहात व भक्तिभावाने पालखी सोहळा साजरा करतात.

होळीच्या दिवशी एक मोठे माडाचे अखंड झाड शेकडो गावकरी मिळून पळवत नेतात आणि उंच उडवून झेलत होळीच्या माळावर आणतात. त्यानंतर जमिनीत खोल खड्डा करून त्यात झाड उभे केले जाते व त्यानंतर होळी पेटवली जाते. होळीमधे अग्निदेवतेला गोडाचे विविध पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात.

शिमगोत्सवाच्या या आठ दिवसांत रत्नागिरीत सर्वत्र खेळीमेळीचे वातावरण असते. एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्याचा, चेष्टामस्करी करण्याचा परवानाच जणूकाही सर्वांना मिळालेला असतो. त्यामुळे एकमेकांच्या नावाने फाका मारून म्हणजेच `बोंबा मारून` गावकरी मनमुराद होळी सणाचा आनंद लुटतात.

अनुभवण्यासारखे खूप काही

सरपटणारे व उभयचर प्राणी

चला तर मग!

कड्यावरचा गणपती, आंजर्ले

चला तर मग!

जांभा खाण

चला तर मग!
Positive SSL