उत्तुंग सह्याद्री पर्वतराजीत उगम पावून केवळ ३० ते ४० किलोमीटर अंतर कापून समुद्रास मिळणाऱ्या अनेक नद्यांच्यामुळे निसर्गाचा सुंदर आविष्कार असणारे अनेक विलोभनीय धबधबे रत्नागिरी परिसरातआढळतात. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या सवतसडा व निवळी या धबधब्यांबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील अंतर्गत भागात मार्लेश्वर, खोरनिनको, देवपाट, धामापूरचा धबधबा, रानपाट धबधबा असे अनेक सुंदर धबधबे पाहून पावसाळी पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेता येतो.

पावसाळ्यात सुमारे दीड हजार फूट उंचीवरून सात टप्प्यांमध्ये कोसळणाऱ्या मार्लेश्वरच्या जलप्रपाताने हजारो वर्षात सह्याद्रीचा भक्कम कातळ अगदी चिरून काढलाय.

पावसाळ्यात असंख्य धारांनी पडणाऱ्या चुना कोळवणचे सौंदर्य खूप रौद्रभीषण भासते. पाऊस कमी झाल्यावर गेल्यास खालच्या डोहांत जलक्रीडेचा मनमुराद आनंद घेता येतो.

पायऱ्यांवरून एका संथ लयीत पडणाऱ्या धबधब्याच्या असंख्य शुभ्र जलधारा बघणं हा कधीही विसरता न येणारा अनुभव आहे.

प्रसन्न वातावरणात वाट कधी सरते ते कळतंच नाही आणि मनावर पडलेल्या रानभुलीतून जाग येते ती धबधब्याची गाज ऐकून.

सगळीकडे फक्त हिरव्या रंगानेच व्यापून टाकणाऱ्या गर्दपोपटी आणि पाचूच्या हिरव्या छटा दिसत असतात. जंगलवाट पार करून गेलं की समोर येतो तो धामापूरचा स्फटिकासारखां शुभ्र धबधबा.

वीर गावांत पोहोचता पोहोचता धबधब्याचा नाद अखंड ऐकू येत असतो, मात्र दाट झाडी पार केल्याशिवाय धबधब्याचं दर्शन होत नाही

हिरव्या गर्द झाडीला चिरत, फेसाळत खाली येणारा एक धबधबा आपल्याला घाटात थांबायला भाग पाडतो.

या धबधब्या भोवती असलेली हिरवाई व उंचीवरून पडणारा रानापाटचा धबधबा पाहून निसर्गापुढे आपण किती लहान आहोत याची जाणीव होते.

मुंबईकडून चिपळूणला येताना महामार्गाच्या डाव्या बाजूला हा धबधबा उंचावरून कोसळताना दिसतो. जुलै ते ऑक्टोबर या काळात धबधब्याला भरपूर पाणी असते

-->
Positive SSL