हजारो वर्षांपासून पूर्वापार चालत आलेल्या परंपरा व श्रध्देमुळे आजही येथिल अनेक मंदिरे भाविकांच्या मनांत आपले स्थान टिकवून आहेत. मंदिरांच्या आसपासचा हिरवागार परिसर, नदी वा सागरतीरी असलेलं त्याचं वास्तव्य, प्राचीन सुंदर मूर्ती, वास्तुरचना आणि येथील अविरत शांततेचा अनुभव इथे भाविक व पर्यटकांना मिळतो.

अखिल महाराष्ट्राचे श्रध्दास्थान म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते ते श्री क्षेत्र गणपतीपुळे हे रत्नागिरीतील अग्रणी स्थानांपैकी एक आहे.

गावातून मंदिरापर्यंत वर चढत आलेली पायऱ्यांची वाट आणि गच्च झाडीने वेढलेला मंदिराचा परिसर….वर्णन करावं तेवढ थोडंच!

मंदिराचा सर्व परिसर केवळ अवर्णनीय आहे. हे देवस्थान एक हजार वर्षे पुरातन असल्याचं मानलं जातं.

हे मंदिर ज्यांनी उभं केलं त्यां शिल्पकारांच्या कलाविष्काराचं कौतुक करावं तेवढ थोडंच आहे. मंदिरावर अप्रतिम शिल्पसौंदर्य कोरलेले आहे.

आकाश भेदत गेलेले उत्तुंग कडे, सरळसोट उंच सुळके, घनदाट निबिड अरण्याने व्यापलेल्या दऱ्या, पावसाळ्यात धडकी भरवणारे प्रचंड जलप्रपात आणि अशा दुर्गम ठिकाणी वसलेला तो प्रलयंकारी मार्लेश्वर…

काश्यप ॠषींना पृथ्वी दान करून स्वतःसाठी समुद्राला मागे हटवून अपरांत भूमीचे म्हणजेच कोकणाचे निर्माते असलेल्या श्री परशुरामांचे प्राचीन मंदिर चिपळूणजवळ १२ किमी अंतरावर आहे.

हे मंदिर केशवराज देवराई म्हणूनही प्रसिध्द आहे. चारही बाजूने दाट झाडी असलेला केशवराजचा मंदिर परिसर जरा गूढरम्य भासतो.

या मंदिरात स्वामी स्वरूपानंदांचे चैतन्यरूपी वास्तव्य आहे अशी भक्तांची धारणा आहे. अतिशय शांत व पवित्र अशा या ठिकाणी मनाला प्रगाढ शांतीचा अनुभव येतो.

इथला एकांत, नारळी पोफळीच्या बागांनी वेढलेला परिसर, स्वच्छ समुद्रकिनारा आणि मनाला वेढून टाकणाऱ्या लाटांच्या घनगंभीर गाजेमुळे वेळणेश्वर परिसर वेगळाच भासतो.

रंगीत तटबंदी, आजूबाजूची आमराई व वेगवेगळ्या रंगीत फुलांनी सजलेल्या बागेच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे हेदवी गणेशाचे दगडी मंदिर पाहून पर्यटक त्याच्या प्रेमात पडतात.

श्री चंडिकादेवीचे मंदिर खूप वैशिष्ट्यपूर्ण व जागृत देवस्थान आहे. डोंगरातील एका नैसर्गिक गुहेत एकसंध पाषाणांत देवीची मूर्ती व गाभारा उभारण्यत आला आहे.

कोळिसरे मंदिर व त्याचा परिसर हा इतक्या दाट झाडीने व्यापलेला आहे, की कोळिसऱ्याच्या या झाडीत गाव आहे का?असा प्रश्न पाहणाऱ्याला पडतो.

आडिवरे येथे शके १२५० म्हणजे इ.स. १३२४ मध्ये हे महापीठ अस्तित्वात आले. आद्य शंकराचार्यांनी याची स्थापना केली असे मानतात.

मंदिर परिसरात तळे असून तळ्यात उतरण्यासाठी पायर्‍याही आहेत. तळ्यात नेहमी अनेक कमळं फुललेली असतात. हिरव्यागार वनराईच्या पार्श्र्वभूमीवर मंदिराचा परिसर उठून दिसतो.

अतिशय सुंदर ठिकाणी असलेल्या या मंदिरामध्ये नवरात्रातील तिसऱ्या माळेनंतर शारदोत्सवाची सुरुवात होते. इथे असणारी शांतता श्रध्दाळूंना खूप भावते.

दूरवर पसरलेला गच्च जंगलाने वेढलेला परिसर, आसपासच्या छातीत धडकी भरवणाऱ्या खोल दऱ्या असे सहयाद्रीचे रौद्रभीषण सौंदर्य टिकलेश्वराच्या डोंगरावर उभे राहून दिसू शकते.

श्री व्याडेश्वर देवस्थान हे शिवपंचायतन आहे. ज्या ठिकाणी शिवाच्या मंदिराबरोबर इतरही देवांची मंदिरे असतात त्याला शिवपंचायतन म्हणतात.

मंदिर सुमारे ४०० वर्षे जुने असून मंदिर बांधणी जांभ्या दगडातील आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात नेहमीप्रमाणे प्रचलित अशी गणेशमूर्ती नसून याच स्वयंभू शिळेला श्री गणेश मानून त्याची पूजा केली जाते.

नंद-यशोदेची ही मुलगी जी कृष्णाच्या ऐवजी वासुदेव–देवकीच्या कोठडीत पोहोचली आणि तिला कंसाने ठार मारण्यासाठी उचलले असता ती त्याच्या हातातून निसटून विंध्यपर्वतावर जाऊन राहिली अशी विंध्यवासीनीची पुराणकथा आहे.

याकूतबाबा १६१८ साली हैद्राबाद सिंध प्रांतातून बाणकोटमार्गे केळशीला पोहोचल्याचे सांगितले जाते. त्यांच्या धर्मनिरपेक्ष आचरणातून त्यांनी जनमानसाच्या मनांत स्थान मिळविले.

कर्नाटकातील अंकोला येथील आर्यादुर्गा देवी ही देवीहसोळ गावाच्या देसाई यांच्या प्रर्थानेनुसार या स्थानावर आली अशी आख्यायिका आहे.

सूर्यनारायणाची मूर्ती ८०० वर्षांपूर्विची आहे. हे मंदिर पूरातन असल्याचा पुरावा मंदिरातील ताम्रपटावरून मिळतो.

सह्याद्रीच्या कुशीत गच्च हिरव्यागार वनांनी वेढलेला संगमेश्वराचा परिसर अनेक राज्यकर्त्यांना भुरळ घालत आला आहे.

हे मंदिर तेराव्या शतकातील असून मूळ हेमाडपंती असलेल्या या मंदिराचा जीर्णोध्दार केल्यामुळे त्याचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते.

एक शांत, प्रशस्त, पुरातन मंदीर म्हणजे नाटेश्वर. राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध नाटे गावाचे हे ग्राम दैवत.

निसर्गरम्य परिसरातून काही कि.मी. अंतर पार केल्यावर सहज इखाद्या चहाच्या हॉटेल वर ‘इथे अजून पाहण्यासारखे काय आहे’ असे विचारावे; उत्तर मिळेल ‘आमचो शिरंब्याचो मल्लिकार्जुन मंदीर’.

मंदिरामध्ये एकावर एक असलेल्या दोन गर्भगृहांमुळे. या मंदिरामध्ये खालच्या गर्भगृहात शंकराची पिंडी आहे तर वरती श्री गणेशाची स्थापना केलेली दिसते

-->
Positive SSL