रत्नागिरीत बघण्यासारखं इतकं काही आहे की आपल्याला दोन डोळे अपुरे वाटू लागतात. प्रत्येक तालुक्यात असणारी अनेक मनोरंजक, वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं पाहाण्यासाठी मात्र जरा वेळ हाताशी हवा. डेरवणची शिवसृष्टी आवर्जून पाहण्यासारखी तर गणपतीपुळ्याचे प्राचीन कोकण दालन व वॅक्स म्युझियम एक उत्तम मनोरंजन करणारे ठिकाण. बुरोंडीचे परशुराम स्मारक भव्य दिव्य तर रत्नागिरीतील विविधरंगी समुद्रीजीवांचे मत्स्यालय चकित करून सोडणारे! तुरळच्या मामाच्या गावचा पाहुणचार अगदी आपुलकीचा तर जामरूण हे अस्सल कोकणी वातावरण अनुभवण्यासाठी एक चुकवू नये असं गाव! बघण्यासारखी ठिकाणे मात्र अनेक आणि वेळ अगदी थोडा असं व्यस्त समीकरण बदलून रत्नागिरीला निवांत आलं तरच मनाचं समाधान होऊ शकत. रोजच्या धकाधकीच्या शहरी वातावरणातून या स्वच्छंदी, मनमोकळ्या, आनंदी रत्नागिरीत परत परत यावं ते स्वतःची स्वतःशीच मैत्री वाढविण्यासाठी!

रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक बंदरे

आंबोळगडाचा तुटलेला काळाकभिन्न कडा, विस्तीर्ण निळाशार समुद्र, खाडीमुखावरचा यशवंतगड हे सारे काही एका दृष्टीक्षेपांत न सामावणारे पण अविस्मरणीय असे आहे.

कोकणामधे अगदी चित्रांत शोभावीत अशी पुष्कळ ठिकाणं आहेत. गुहागर तालुक्यातील `बुधल सडा` हा परिसर या बाबतीत विशेष आहे.

एरवीच्या नेहेमीच्या ट्रीप मध्ये जो अनुभव आपल्याला येऊ शकत नाही असा अनुभव आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सुरु झालेल्या निसर्ग पर्यटन केंद्रांमध्ये मिळतो.

गुलाबाच्या पाकळ्या उलगडत गेल्यावर जसे फुलाचे सौंदर्य अधिक खुलते तसे रत्नागिरी जिल्ह्याचे आहे. रत्नागीरी मध्ये जरा आड वाटाने फिरा, रत्नागिरी जिल्ह्याचे अंतरंग अजून खुलत जातील.

असे वाचल्यावर हे ‘भू’ काय आहे हा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. संपूर्ण भारतातील एकाक्षरी नाव असलेले हे बहुदा एकमेव गाव असावे.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी शहरात रत्नदुर्ग किल्ल्याजवळ आहे. येथे खाऱ्या व गोड्या पाण्यातील विविध प्रकारचे मासे व इतर जलचर यांचे संग्रहालय आहे.

जुन्या काळातील कौलारू कोकणी घर, कौलांमधून सारवलेल्या जमिनीवर पडणारे उन्हाचे कवडसे, सारवलेल्या कुडाच्या भिंती, घराची प्रशस्त पडवी, इथे जाणवणारी शांतता, निवांतपणा हे सर्व अनुभवण्यासारखं आहे.

अपरांत भूमीचे स्वामी असणाऱ्याश्री परशुरामांच्या भव्य स्मारकाचा हा परिसरगर्द हिरवाईने वेढलेला असून दूरवर दिसणारा लाडघर समुद्रकिनारा इथल्या सौंदर्यात अजून भर घालतो.

कोकणाची प्राचीन समाजरचना, वेषभूषा, जुनी केशभूषा, बारा बलुतेदारी, जुनी उपकरणे व हत्यारे यांचा वापर करून हुबेहूब दिसणाऱ्या पुतळ्यांच्या सहाय्याने इतिहास जिवंत केला आहे.

सुंदर शिल्पांच्या माध्यमातून शिवकालातील साकारलेले विविध प्रसंग अक्षरशः जिवंत वाटतात व बघणाऱ्यांना खिळवून ठेवतात. शिवराज्याभिषेकाचं शिल्प फारच अप्रतिम आहे.

अनेक सुपरिचित कलाकारांबरोबर भारतातील मान्यवर व्यक्तींचे अगदी हुबेहूब वाटणारे मेणाचे पुतळे इथे ठेवले आहेत. इथे केलेली रंगसंगती, प्रकाश योजना यामुळे हे पुतळे सजीव वाटतात

-->
Positive SSL