रत्नागिरीचे ऐतिहासिक महत्त्व आणि जिल्ह्यातील अनेक भागांचा इतिहास हा रोचक, क्रांतिकारी व तेवढाच प्रेरणादायी आहे. ब्रिटिश कालखंडात येथे अनेक महत्त्वाच्या घटना व घडामोडी घडल्या आहेत. लो. टिळकांचा जन्म, थिबा राजाची कैद, सावरकरांचा बंदिवास, अस्पृशांचा मंदिरप्रवेश या इंग्रजकाळात रत्नागिरी शहरात घडलेल्या घटना नोंद घेण्यासारख्या आहेत. साने गुरुजी, कवी केशवसूत यांच्या सारखी अनेक थोर व्यक्तिमत्वे या मातीत घडली आहेत.

स्वातंत्र्य संग्रामाचे अध्वर्यू लोकमान्य टिळक यांचा जन्म १८५६ मधे रत्नागिरीत झाला. रत्नागिरी शहरांतील मध्यवर्ती भागांत टिळक आळीत त्यांचे हे टुमदार कोकणी घर संरक्षित करण्यात आले आहे.

आंबडवे या बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारक उभे करण्यात आले आहे. हा परिसर रम्य असून स्मारक परिसरांत व वास्तूमधे बाबासाहेबांच्या वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.

ज्ञानापीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज यांनी या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी ‘हे स्मारक म्हणजे मराठी कवितेचं तीर्थक्षेत्र तर मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे.’ असे गौरवोद्गार काढले आहेत.

भारत सरकार तर्फे १९५८ साली `भारतरत्न` हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन धोंडो केशव कर्वे या महान समाज सुधारकाचे कार्य गौरविण्यांत आले.

या स्मारकाच्या पहिल्या मजल्यावर ‘गाथा बलिदानाची’ ही प्रदर्शनी असून अनेक देशभक्त, क्रांतिकारक, हुतात्मे यांचा स्फूर्तीदायी, त्यागमय व तेजस्वी इतिहास दालनांमधून मांडण्यात आला आहे.

१९१० मधे सुमारे सत्तावीस एकर आणि साडेअकरा गुंठ्यांच्या विस्तीर्ण जागेवर त्याकाळांत एक लाख सदतीस हजार रुपये खर्च करून हा प्रशस्त, ब्राह्मी पद्धतीचा, तीन मजली राजवाडा बांधला गेला.

Positive SSL