रत्नागिरी जिल्ह्यामधे सह्याद्रीच्या भर माथ्यावर अनेक भक्कम गिरीदुर्ग फार प्राचीन काळापासून उभे आहेत. तसेच कोकणकिनाऱ्याचे रक्षणकर्ते असलेले अनेक सागरीदुर्ग अरबी समुद्रांत वसले आहेत. सागरतटी उभे असलेले किनारी दुर्ग, खाड्यांच्या मुखांवरील रक्षणकर्ते जलदुर्ग अशा अनेक प्रकारांत मोडणारे २८ किल्ले आहेत जे रत्नागिरी जिल्ह्याची भटकंती करताना पाहता येऊ शकतात.

आपल्या स्थलमहात्म्यासाठी प्रसिद्ध असणारा सुवर्णदुर्ग हा कोकणातील महत्वाचा जलदुर्ग आहे. दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ किनाऱ्यापासून अडीचशे मीटर अंतरावर समुद्रांत आठ एकरवर हा किल्ला वसला आहे.

अनेक शतकं रत्नागिरी परिसराचा राखणदार व अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या या किल्ल्याला भेट दिल्यावर एखाद्या जाणकार बुजुर्गाला भेटल्याची अनुभूती आपल्याला येते.

गणपतीपुळ्यापासून १६ कि.मी. अंतरावरील जयगड बंदर हे अनेक शतकांपासून व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे राहिले आहे. अशा या ऐतिहासिक बंदराजवळ जयगड सागरीदुर्ग शतकानुशतके उभा आहे.

अंजनवेल मोक्याच्या ठिकाणावर वसला असल्याने अनेक सत्ताधारी त्याचे महत्व ओळखून होते. इ.सं.१७५५ रोजी तुळाजी आंग्रे यांनी याकूतखानाकडून अंजनवेल किल्ला जिंकून त्याचे गोपाळगड असे नामकरण केले.

किल्ल्याची सरंक्षक तटबंदी, बुरुज आजही टिकून आहेत. मुख्य दरवाज्यावर गणेशपट्टी आहे. किल्ल्यापासून काही अंतरावर सावित्री नदी वाहते.

हा किल्ला `गिरीदुर्ग` या प्रकारांत मोडणारा आहे. या किल्ल्याची तटबंदी ८ एकर क्षेत्रात पसरली असून इथून दिसणाऱ्या परिसराचे दृष्य अत्यंत मनोहारी असते.

दक्षिणेकडे सुरुच्या दाट बनांनी झाकलेला गावखडीचा निर्मनुष्य समुद्रकिनारा या ठिकाणाहून खूप सुंदर दिसतो. गडावरील सर्व वास्तू तटबंदीवर उभं राहून नीट दिसू शकतात.

पावसाळ्यात भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी रसाळगड हा एक उत्तम पर्याय आहे. पर्जन्य ऋतुमधे रसाळगडाचे सौंदर्य खूप उठून दिसते.

बुरुजावरून तटबंदीला फेरा मारत असताना नदीचे पात्र उजवीकडे रहाते जे वरून फार विहंगम दिसते. तटावरून चालताना वशिष्ठी नदीवरील बंदर दृष्टीस पडते.

Positive SSL