खवय्यांसाठी रत्नागिरी एक चुकवू नये असे ठिकाण आहे. चमचमीत कोकणी चवीचे मसाले, नारळ व स्थानिक भाज्या वापरून केलेले हे पदार्थ खवैय्यांना अगदी तृप्त करतात. रत्नागिरीतील खाद्यसंस्कृती समृध्द असून येथील पारंपरिक शाकाहारी व मांसाहारी पदार्थ त्यांच्या रुचकर चवीसाठी सर्वत्र प्रसिध्द आहेत.

ओला नारळ, गूळ, खसखस, विलायची या पासून तयार केलेले सारण व सुवासिक तांदळाची पिठी वापरून बनविलेले गरम गरम उकडीचे मोदक आणि त्यावर साजूक तूप असा खास बेत जमवावा.

विविध प्रकारची ताजी मासळी, कोळंबी, खास कोकणी मसाले वापरून बनवलेले चिकन यांसह विविध रस्से या पदार्थाचा मनसोक्त आस्वाद घ्या.

Positive SSL