रत्नागिरीत साजरे केले जाणारे अनेक सण-उत्सव हे स्थानिकांसाठी उत्साहाची, भक्तीची, आनंदाची पर्वणी ठरतात. वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या अनेक सण व उत्सवांमधून स्थानिकांना जगण्याची नवी उर्जा मिळत असते. कोकणातील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेले व अतीव उत्साहाने साजरे होणारे सण म्हणजे गणेशोत्सव व शिमगोत्सव. देशाच्या कानाकोपऱ्यातून रत्नागिरीवासी हे सण साजरे करण्यासाठी या काळात रत्नागिरीत पोहोचणारच. सण-उत्सवांच्या निमित्ताने भरणाऱ्या विविध यात्रा-जत्रांची वाट तर समस्त कोकणवासी पाहात असतात. या उत्साही वातावरणात सहभागी होऊन आपणही नवी उर्जा घेऊनच परततो.

रत्नागिरी जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांमधून घरोघरी लाडक्या गणेशाचे आगमन झाले की सकाळ संध्याकाळ समुहाने, साग्रसंगीत टाळ मृदुंगाच्या साथीने म्हंटल्या जाणाऱ्या आरत्यांचे सूर घराघरातून ऐकू येऊ लागतात.

रत्नागिरीमध्ये होळी सण खूप वेगळ्या पध्दतीने साजरा होतो. सर्वसाधारणपणे आठ दिवस हा शिमागोत्सव सर्वत्र साजरा होतो. काही ठिकाणी पालख्या नाचवल्या जातात तो सोहळाही बघण्यासारखा असतो.

देवी म्हणजे माता किंवा जननी. नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला शहरांमधून लुप्त झालेली घागरी फुंकायची प्रथा आजही रत्नागिरीत अनेक ठिकाणी बघायला मिळते.

Positive SSL