रत्नागिरीतून भटकंती करताना नागमोडी वळणांचे घाट रस्ते, जंगले, डोंगरउतार, समुद्रकिनारे, जांभ्याचे सडे व विस्तीर्ण माळ, खारफुटीची जंगले, नद्यांच्या विस्तीर्ण खाड्या, देवराया व कोकणी वाड्या असे विविध अधिवास बघायला मिळतात. प्रत्येक अधिवास हा वैविध्यपूर्ण असून त्याची स्वतःची खास अशी वैशिष्ट्ये आहेत. या विविध अधिवासांमध्ये विपुल प्रमाणात जैवविविधता आढळते. शेकडो प्रकारचे प्राणी, पक्षी, उभयचर यांनी हा परिसर समृद्ध आहे.

रत्नागिरीतीलं वशिष्ठी व सावित्री या नद्यांमधून इथे गोड्या पाण्यातील अवाढव्य मगरीही वास्तव्य करून आहेत. बोटीत बसून किनाऱ्यावर विसावलेल्या मोठाल्या मगरी बघत खाडीतून मारलेला फेरफटका खूप रोमांचकारी असतो.

दरवर्षी, महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, दाभोळ, गावखडी येथील गावकरी एका हृदयस्पर्शी सोहळ्याचे साक्षीदार बनतात कारण या किनाऱ्यांवर नव्याने जन्माला आलेली हजारो ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची पिल्ले निळ्या समुद्रात जाण्यासाठी त्यांचे चिमुकले पाऊल उचलतात.

डोंगरमाथा, गच्च जंगले, जांभ्यांचे सडे, विस्तीर्ण मैदाने, कोकणी वाड्या, नद्या, खाडी परिसर, समुद्रकिनारा अश्या विविध अधिवासांमधे आश्रय घेणारे हे विहग वैभव खूप समृध्द असून विविधतेने भरलेले आहे.

एखाद्या डोंगरावर, नदीकिनारी किंवा पाणवठ्यावर बसून दोन तीन तासांत विविध ४०-५० जातींची फुलपाखरे सहज दिसू शकतात. ही फुलपाखरे निसर्गातील परागीभवनाचे एक महत्वाचे काम पार पाडतात.

जिल्ह्याच्या पूर्वेस सह्याद्रीच्या वनांचा नैसर्गिक अधिवास असल्याने कोल्हे, तरस, अस्वल यांच्याबरोबरच सुमारे ८०० किलो इतक्या वजनाच्या गव्यांचेही इथे अस्तित्व आहे.

खारफुटीची जंगले त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता कमी करतात असे आढळून आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यांतील केळशी, पडले-आंजर्ले, गुहागर, भाट्ये, दाभोळची खाडी या ठिकाणांवरविविध जातींच्या खारफुटींची समृध्द जंगले आहेत.

Positive SSL