कोकणाची माती अनेक गुणांची उपज करणारी आहे. रत्नागिरी तर नावाप्रमाणे रत्नांची खाण आहे. जाखडी, धनगरी नृत्य, पालखी नृत्य अशी विविधता जोपासणारी व समाजजीवन वृद्धिंगत करणारी येथील नृत्यकला, पिढ्यानपिढ्या चालत आलेली गणेशमूर्ती कला व अनेक पारंपरीक कला-कौशल्यं जोपासणारे येथील स्थानिक कलाकार हे तर रत्नागिरीचं एक खास वैशिष्ट्य!

निसर्गातच ज्यांचा भरपूर वावर आहे, निसर्गावर ज्यांचं जीवन अवलंबून आहे अशा धनगर समाजाचं निसर्गाशी असलेलं नातं त्यांच्या `धनगरी नृत्यां` मधूनही व्यक्त होत राहातं.

उत्सवाच्या खूप अगोदर गणेशभक्तांनी नेहेमीच्या मूर्तीशाळेत आपल्याला हव्या त्या रूपातील गणेशमूर्तीची नोंदणी केलेली असते व त्यानुसार हे कुशल मूर्तीकार भक्तांच्या मनातील गणेशाला अक्षरशः मूर्त स्वरूपात उतरवतात.

गणेशोत्सव जवळ आला की सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार होते आणि मनाला नवी ऊर्जा देणाऱ्या पारंपरिक `जाखडीचे` स्वर सगळीकडे घुमू लागतात

Positive SSL