रत्नागिरी जिल्हा हा साहसवेड्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. सायकलिंग, बायकिंग, पदभ्रमण, व्हॅली क्रॉसिंग, स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा असे अनेक साहसी क्रीडा प्रकार रत्नागिरीत विविध ठिकाणी अनुभवता येतात. आपल्या सवडीनुसार, आपल्याला परवडणारे, आनंद देणारे आणि मुख्य म्हणजे आपली साहसाची आवड भागविणारे हे क्रीडाप्रकार सर्व वयोगटातील पर्यटकांना कायमच खुणावत असतात. मग वाट कसली बघताय? उचला आपली सॅक आणि निघा लगेच! रत्नागिरीत हरवून जाण्यासाठी…..

लाटांवर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने बोटीतून सफर करण्याचा अनुभव खूप रोमांचक असतो तर मित्रमैत्रिणींसकट बनाना राईड्सवर एकत्र बसून पाण्यात डुबकी घेताना खूप मजा येते.

या जलविश्वात अनेक आश्चर्ये दडलेली आहेत. या रंगीबेरंगी दुनियेची झलक बघायची सुवर्ण संधी रत्नागिरी च्या मिऱ्या बंदर येथे आता उपलब्ध आहे.

गुलाबी थंडी… धुक्यात लपेटलेली सकाळ… कधी दाट झाडीतून, तर कधी प्रशस्त जांभ्याच्या सड्यावरून, कधी दमछाक करणाऱ्या घाटरस्त्याने, तर कधी अथांग समुद्रास साक्षी ठेवत केलेली ही भटकंती संस्मरणीय ठरते.

दोरीच्या सहाय्याने तिला लटकत दरीवरून जाताना खोलवर खाली फेसाळणारा विशाल समुद्र, हिरवीगार वनश्री, भाट्ये किनाऱ्यावर चालेलेली पर्यटकांची धमाल हे सर्व उंच हवेत लटकत असताना बघणे हा अनुभव थरारक असतो.

पावसाळ्यात पांढऱ्याशुभ्र खळाळत वाहणाऱ्या असंख्य जलधारा ल्यायलेला सह्याद्री डोळ्यात साठवून ठेवावा असा असतो. लांजा तालुक्यातील माचाळ हे थंड हवेचे ठिकाण तर पदभ्रमणासाठी अक्षरशः स्वर्ग आहे.

Positive SSL