सह्याद्री निसर्गमित्र संघटनेने सर्वात प्रथम या घटनेची नोंद घेतली. त्यांच्या निरीक्षणानुसार या किनाऱ्यांवर दरवर्षी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या अनेक माद्या अंडी घालण्यासाठी येत असून कासवांच्या अंड्यांच्या संरक्षणाची तेव्हा नितांत गरज होती. त्यांच्या आंदोलनात स्थानिक गावकऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि कासावांच्या अंड्यांचे काळजीपूर्वक संरक्षण करण्याच्या कामास सुरुवात झाली. वेळास गावामध्ये प्रथम सुरू झालेल्या या कासव संवर्धन प्रकल्पामुळे अन्यथा दुर्लक्षित असलेला वेळासचा समुद्रकिनारा जगाच्या नकाशावर आला.

अनेक वर्षांपासून डिसेंबर ते मे या कालावधीत ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या माद्या प्रजनन हंगामात अंडी घालण्यासाठी रत्नागिरीतील विविध किनारी येतात. या अंड्यांची सुरक्षितता सुनिश्चित केल्यानंतर गावकऱ्यांनी प्रत्येक वर्षी या किनाऱ्यांवर कासव महोत्सव साजरे करण्यास सुरुवात केली. या कासव महोत्सवांमुळे वेळास, आंजर्ले, गावखडी येथे आता निसर्ग पर्यटन सुरु झाले आहे आणि स्थानिक ग्रामस्थांसाठी आणि कासव संवर्धनाच्या मोहिमेकरिता उत्पन्नाचा एक चांगला स्रोत निर्माण झाला आहे.

सह्याद्री निसर्गमित्र संस्था आणि गावकऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे गेल्या १५ वर्षांत रत्नागिरीतील वाळूच्या विविध किनाऱ्यांवर जन्माला आलेल्या कासवांच्या ५०,००० हून अधिक पिल्लांना सुरक्षित समुद्रात सोडून त्यांच्या संवर्धनाचे एक अनोखे उदाहरण या गावांनी निर्माण केले आहे. कासव संवर्धनाचे हे अद्वितिय कार्य बघण्यासाठी रत्नागिरीला भेट दिलीच पाहिजे.

कासव संवर्धन केंद्रे - वेळास, केळशी, अंजर्ले, मुरुड, दाभोळ, गुहागर, गावखडी 

अनुभवण्यासारखे खूप काही

प्राचीन मंदिरे – कसबा संगमेश्वर

चला तर मग!

जांभा खाण

चला तर मग!

वेळणेश्वर समुद्रकिनारा

चला तर मग!
Positive SSL