समुद्र व त्याच्या लगतच्या परिसंस्था या अनेक सजीवांना अन्न पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडतात.  किनारपट्टीवरील समृध्द खाजण किंवा खारफुटी हे एका निरोगी पर्यावरणाचे द्योतक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी, पडले-आंजर्ले, गुहागर, भाट्ये, दाभोळची खाडी या ठिकाणांवर विविध जातीच्या खारफुटींची समृध्द जंगले आहेत.

ही वने समुद्रकिनाऱ्यालगत, खाडीपरिसरात किंवा नद्यांच्या दलदलीच्या व नियमितपणे भरती-ओहोटी येणाऱ्या भूभागावर पसरलेली असतात. खारफुटीची जंगले असंख्य प्राण्यांना, पक्ष्यांना, जलचरांना निवारा व अन्न पुरवितात. खाजणात शिरणारे पाणी संथ असून त्याचे तापमान आजूबाजूच्या पाण्यापेक्षा उबदार असल्यामुळे अनेक प्रकारचे मासे, खेकडे, मडस्कीपर्स यांच्या प्रजननाचे हे ठिकाण असते. ही वने अनेक स्थलांतरित प्राणी व पक्ष्यांचे विश्रांतीस्थान असून नष्ट होणाऱ्या अनेक दुर्मिळ प्रजातींसाठी खारफुटीची जंगलं हा शेवटचा आसरा असतो.

सागरी व जमिनीवरील नैसर्गिक परिसंस्थेचा दुवा सांधण्याचं काम ही जंगले करत असतात. खारफुटीच्या वैशिष्ट्यपूर्ण मुळांमुळे खाऱ्या पाण्यातही ही झाडे तग धरतात. त्यांनाही सुंदर फुले व फळे येतात. समुद्राकडून होणारा सागरी लाटांचा तुफान मारा, चक्रीवादळे यांपासून किनाऱ्यांचे रक्षण करताना जमिनीची धूप थांबवण्याचे महत्त्वाचे काम खारफुटीची जंगले करतात. त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता ही जंगले कमी करतात. खारफुटीच्या अशा अनोख्या वैशिष्ट्यांमुळे त्यांचे किनारपट्टीवरील महत्त्व अधोरेखित होते.

अनुभवण्यासारखे खूप काही

श्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर

चला तर मग!

गोडवणे समुद्रकिनारा

चला तर मग!

मासेमारी

चला तर मग!
Positive SSL