पाऊस संपत आला तरी रत्नागिरीत व पूर्वेकडील सह्याद्रीच्या रांगांवर सगळीकडे हिरवळ व अनेकरंगी फुलांचा  बहर असतोच. मात्र आता त्या नाजूक रानफुलांवर तितकीच नाजूक बहुरंगी फुलपाखरं भिरभिरत असतात. कीटकांच्या जगातील सर्वात सुंदर व विलोभनीय फुलपाखरं बघणं हा मनाला पुनःश्च तरुण बनवणारा अनुभव असतो. निसर्गातील परागीभवनाचे एक महत्त्वाचे काम हे चिमुकले घटक पार पाडतात.

ऑक्टोबरपासून ते जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत सगळीकडे उमललेल्या फुलांमुळे रत्नागिरीत फुलपाखरांची जणू रेलचेल असते. हिवाळ्यानंतर मात्र त्यांची संख्या रोडावू लागते. रत्नागिरीत एखाद्या डोंगरावर, नदीकिनारी किंवा पाणवठ्यावर बसून दोन-तीन तासांत ४०-५० जातींची विविध फुलपाखरे सहज दिसू शकतात.

फुलपाखरांचे हे बहुरंगी सुंदर विश्व कॅमेऱ्यात बंदिस्त करणे हा छायाचित्रकारांसाठी एक हवाहवासा अनुभव असतो. महाराष्ट्राचे `राज्य फुलपाखरू` हा दर्जा मिळविणारे `ब्लू मॉरमॉन` किंवा `निळवंत` हे फुलपाखरू तर आवर्जून बघण्यासारखे असते. फुलापाखारांचे विश्व हे चिरतारुण्याचे स्वच्छंदी जग असून त्यात अल्प काळांत सृष्टीला मोहकपणे खुलविण्याची जादू आहे.

फुलपाखरांबरोबर परागीभवनाचे काम पार पाडणारे इतरही अनेक कीटक रत्नागिरीत आढळून येतात. लालभडक रंगाचा `मृग किडा` पावसाळा जवळ आल्याचे दर्शवतो तर अनेक जातींचे चतुर, भुंगेरे म्हणजेच `बीटल्स` जातीचे भुंगे आपल्या भडक व चमकदार रंगांमुळे लक्ष वेधून घेतात. आपल्या दृष्टीआड बहरणाऱ्या या संपन्न सृष्टीतील घडामोडी समजून घेणंही तेवढंच रंजक असतं.     

अनुभवण्यासारखे खूप काही

आंजर्ले समुद्रकिनारा

चला तर मग!

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

चला तर मग!

आंबोळगड

चला तर मग!
Positive SSL