रत्नागिरीची सफर ही कोकणातील समृध्द पक्षीजीवन पाहिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. डोंगरमाथा, गच्च जंगले, जांभ्याचे सडे, विस्तीर्ण मैदाने, कोकणी वाड्या, नद्या, खाडी परिसर, समुद्रकिनारे अश्या विविध अधिवासांमधे आश्रय घेणारे इथले पक्षीवैभव खूप समृध्द असून विविधतेने भरलेले आहे. पक्षीप्रेमींसाठी वर्षभरातील कोणत्याही ऋतूत गेलं तरी रत्नागिरीत पक्षी निरीक्षणाची संधी मिळतेच.

इथल्या परिसरात तुरेवाला सर्पगरूड, व्याध, ऑस्प्रे, दलदल ससाणा, शिक्रा, कापशी, पांढऱ्या डोक्याची समुद्री घार असे अनेक शिकारी पक्षी व निरनिराळ्या जातींची घुबडे वास्तव्य करून आहेत.

किनाऱ्याला लागून असलेल्या सुरु, केवड्याच्या बनांमधे आणि नारळी पोफळी, आंबा, काजूच्या बागांतून, छोट्या छोट्या झुडपांमधे तर उंच मोठाल्या वृक्षांवर जेवढी पक्ष्यांची विविधता आढळते तेवढी इतरत्र क्वचितच आढळत असेल. खंड्या, खाटिक, स्वर्गीय नर्तक, वेडा राघू अशा डोळ्यांना सुखाविणाऱ्या विविधरंगी पक्ष्यांबरोबरच सुभग, पावश्या, टकाचोर, शिंजीर, हरियाल या स्थानिक कोकणवासीयांचा मधुर स्वरही कानाला तेवढाच सुखावणारा असतो.

बाकदार तीक्ष्ण चोच, पांढरे पोट व पंखांना काळी झालर असलेला रुबाबदार समुद्र गरुड हे कोकणकिनाऱ्याचे वैभव आहे. उंच सुरुच्या झाडावर घरट्यातील आपल्या पिल्लांना भरवणारी नर मादीची जोडी खूप सुंदर दिसते. आपल्या तीक्ष्ण नख्यांत समुद्री साप किंवा मोठा मासा घेऊन अथांग सागरावरून भराऱ्या घेत जाणारा समुद्र गरूड बघणं हा अनुभव न विसरता येणारा असतो.

रत्नागिरीचा संपन्न परिसर विविध ठिकाणी वस्ती करून राहणाऱ्या या पक्ष्यांच्या अन्न, निवारा अशा सर्व गरजा भागवतो. या पक्षीगणांची स्वतःमधे बदल घडवून कुठल्याही परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता अफाट आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

गोवळकोट उर्फ गोविंदगड, चिपळूण

चला तर मग!

सुपारी (पोफळी)

चला तर मग!

वॅक्स म्युझियम, गणपतीपुळे

चला तर मग!
Positive SSL