पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा व दऱ्या अनेक वन्यजीवांचे आश्रयस्थान आहेत. इथली गच्च वनराई, दुर्गम परिसर, पाण्याची मुबलकता या घटकांमुळे अनेक वन्यजीव इथे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. रत्नागिरी जिल्ह्यांतील अनेक तालुके हे सह्याद्रीच्या रांगांलगत वसले आहेत. जिल्ह्याला वनअच्छादनही भरपूर आहे. एखाद्या परिपूर्ण परीसंस्थेला लागणारे सर्व घटक इथे अनुकूल असल्याने रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक वन्यजीव आढळून येतात.

ससे, भेकर, रानडुक्कर, ढोल (रानकुत्री) अशा प्राण्यांबरोबरच बिबट्या हा अन्नसाखळीतील सर्वोच्य स्थानावरील प्राणीही रत्नागिरीत आढळतो. जिल्ह्याच्या पूर्वेस सह्याद्रीच्या वनांच्या नैसर्गिक अधिवासात कोल्हे, तरस, अस्वलं यांच्याबरोबरच सुमारे १,००० किलो वजनाच्या गव्यांचेही इथे वास्तव्य आहे. संगमेश्वर, लांजा या सह्याद्री  लगतच्या तालुक्यांमधे अनेक वन्यजीवांचे अस्तित्व आढळून आले आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी असलेले शेकरू व राज्यपक्षी हरियाल हे रत्नागिरी जिल्ह्यात विपुलतेने आढळून येतात.

रत्नागिरीतील अंतर्गत भागांत पसरलेल्या सह्याद्रीच्या उपरांगांवर भरपूर वनश्री असल्याने येथे माकडे, सांबर, भेकर अशा प्राण्यांबरोबर क्वचित केव्हातरी पट्टेरी वाघही दर्शन देऊन जातो. रत्नागिरीतील जांभ्याचे सडे उंदीर, मुंगूस, ससे अशा अनेक छोटयाछोटया वन्यजीवांना आसरा देतात. एकूणच वैविध्याने परिपूर्ण असा हा भूभाग एका संपन्न परिसंस्थेचे द्योतक असून रत्नागिरीचा परिसर अनेक अभ्यासक व संशोधकांना कायमच खुणावत असतो.

अनुभवण्यासारखे खूप काही

वेळासचा समुद्रकिनारा

चला तर मग!

कातळशिल्पं (खोदचित्रे)

चला तर मग!
Positive SSL