गुहागर येथून मोडका आगरमार्गे साधरण २० किमी अंतर कापून गेल्यावर तीव्र उतार असलेला वळणावळणांचा रस्ता उतरून वेळणेश्वर गावात जाता येतं. हे गाव सुमारे १२०० वर्षांपूर्वी वसलं आहे असं सांगितलं जातं. वेळणेश्वरचा निसर्गरम्य समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे.

तालुका - गुहागार

बस स्थानक - गुहागार

रेल्वे स्थानक - चिपळूण

योग्य काळ - ऑक्टोबर ते मे

नारळी पोफळींच्या बागांची झालर लाभलेला,स्वच्छ, विस्तीर्ण व लाटांच्या घनगंभीर गाजेने वेढलेल्या वेळणेश्वर समुद्रकिनार्‍याचे वेगळेपण त्याच्या अशा वैशिष्ट्यांमुळे उठून दिसते. चंद्रकोरीप्रमाणे दिसणाऱ्या किनार्‍यावर नारळाच्या उंचच उंच बागा पाहाण्यासारख्या आहेत.

किनार्‍यावर  वेळणेश्वराचे सुंदर शिवमंदिर आहे. मंदिराच्या बाजूने जो भाग समुद्रात घुसला आहे त्याला `मेरूमंडल` असं म्हंटलं जातं. या गावाचा इतिहास हा वेळणेश्वर मंदिराचाच प्राचीन इतिहास आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे येथे निवासव्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने वेळणेश्वरला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. गावत राहाण्यासाठी उत्तम घरगुती निवासव्यवस्था व हॉटेल्स उपलब्ध आहेत. वेळणेश्वर भक्तनिवासातही उत्तम सोय होऊ शकते. वेळणेश्वरमध्ये प्रवेश करताना घाटातून किनाऱ्यावरील हिरव्या गर्द नारळाच्या झाडांच्या पार्श्वभूमीवर लांबवर, अगदी क्षितिजापर्यंत पसरलेला समुद्र बघताना आपण स्वतःला हरवून बसतो.

अनुभवण्यासारखे खूप काही

आरे-वारे समुद्रकिनारा

चला तर मग!

वॅक्स म्युझियम, गणपतीपुळे

चला तर मग!

सायकलिंग व बायकिंग

चला तर मग!
Positive SSL