अनेक वर्षांपासून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या माद्या या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. या अंड्यांचे व्यवस्थित संरक्षण केले जाते. गावकरी कासवांची पिल्लं वाळूमधून बाहेर यायच्या तारखांचा अगोदरच अंदाज घेऊन येथे कासव महोत्सव भरवतात. शेकडो कासवप्रेमी या महोत्सवाला दरवर्षी हजर असतात. या निमित्ताने वेळास गावात आता निसर्गपर्यटन सुरू झाले आहे.

तालुका - मंडणगड

बस स्थानक - वेळास

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - फेब्रुवारी ते मे

सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने या किनाऱ्याचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य ओळखलं. संपूर्ण गावाने एक होत श्री. भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कासव संरक्षणाची शपथ घेतली आणि एकेकाळी दुर्लक्षित असलेलं वेळास गाव जगाच्या नकाशावर आलं.

दर वर्षी डिसेंबर ते मे या पाच महिन्यांत किनाऱ्यावर वर्दळ वाढू लागते,अर्थात कासवांची! फेब्रुवारी ते मे या काळात इथे कासव महोत्सव आयोजित केला जातो.  अनेक स्थानिक महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांची राहाण्याची व जेवणाची सोय करतात. यातून एक उत्पन्नाचा चांगला स्रोत येथील स्थानिकांसाठी निर्माण झाला आहे.

सह्याद्री निसर्गमित्र संस्था आणि वेळासच्या गावकऱ्यांनी मिळून गेल्या १५ वर्षांत कासवाच्या ५०,००० हून जास्त पिल्लांना सुरक्षित समुद्रात सोडले आहे. असा हा आगळावेगळा सोहळा बघणं हा न विसरता येणारा अनुभव असतो.

अनुभवण्यासारखे खूप काही

महाकाली मंदिर, आडिवरे

चला तर मग!

पन्हाळेकाजी लेणी

चला तर मग!

वेळणेश्वर मंदिर, गुहागर

चला तर मग!
Positive SSL