आंजर्ले ख़ाडीजवळील डोंगररांगांमधून प्रवास करून आल्यावर खाली मुरुडचा समुद्रकिनारा आपले स्वागत करतो. पांढर्‍याशुभ्र समुद्रिपक्ष्यांच्या सान्निध्यात हरवून गेलेला मुरुडचा किनारा तिथे दिसणार्‍या `डॉल्फिन्स`साठीही प्रसिध्द आहे. फेसाळत्या लाटांच्या पार्श्वभूमीवर आकाशात झेपावणारे पांढऱ्याशुभ्र `सीगल` पक्ष्यांचे थवे इथे भरपूर दिसतात.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - ऑक्टोबर ते मे

थंडीच्या दिवसांत समुद्र शांत असल्यावर छोट्या बोटींमधून समुद्रात जाऊन डॉल्फिन्सची जलक्रीडा अनुभवता येते. वेगवान लाटांवर आरूढ होत खोल समुद्रात जाऊन आसमंतात पसरलेल्या संधिप्रकाशाचे सौंदर्य अनुभवत केलेल्या वेगवेगळ्या `वॉटर राईड्स` खूप रोमांचकारी असतात. या परिसरात पर्यटकांच्या राहाण्याची व जेवणाची चांगली सोय होऊ शकते. अनेक उत्तमोत्तम `बिच रिसॉर्ट्स` मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत.

अनुभवण्यासारखे खूप काही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

चला तर मग!

मुरूड समुद्रकिनारा

चला तर मग!

पंखांवरचे भरारते जग

चला तर मग!
Positive SSL