मंडणगडची सफर पूर्ण करून दापोलीच्या वाटेवर जाताना केळशीचा ३ किमी लांबीचा किनारा लागतो. रेशमी वाळू असलेला हा किनारा केवडा, सुरुची बने आणि नारळी-पोफळीच्या गर्द बागांनी अजूनच खुलून दिसतो. दाट झाडी पार करून गेल्यावर सुरुच्या बनातून या किनाऱ्याचं सौंदर्य काही औरच भासतं.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - ऑक्टोबर ते मे

कोकणी भाषेत समुद्रकिनाऱ्याजवळील खडकाळ भागास `खडप` असे म्हणतात. केळशीमधील उटंबर डोंगराजवळील समुद्रात घुसलेल्या काळ्या कातळांवर विविध प्रकारची सागरी संपत्ती मिळू शकते. खडकांवर साठलेल्या पाण्यांत शंख, शिंपले, कवड्या, समुद्री काकड्या, अर्चीन्स, खेकडे असे विविध समुद्रीजीव आढळतात. मौल्यवान सागरी खजिना बघण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. त्याचप्रमाणे केळशी किनाऱ्यावर एक प्रचंड मोठी वाळूची टेकडी तयार झालेली दिसते. फार पूर्वी केव्हातरी आलेल्या त्सुनामीमुळे ही टेकडी तयार झाली असावी असा संशोधकांचा अंदाज आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

विंध्यवासिनी मंदिर, चिपळूण

चला तर मग!

गरम पाण्याचे झरे, उन्हवरे

चला तर मग!

आरे-वारे समुद्रकिनारा

चला तर मग!
Positive SSL