शांत, निवांत, प्रदूषणरहित सागरकिनारा, ४ कि.मी.लांबवर पसरलेली मऊसूत वाळूची पुळण, लाटांबरोबर किनाऱ्यावर येणारे सुंदर शंख शिंपले हे सर्व अनुभवायचं असेल तर एखादी सुट्टी कर्दे किनाऱ्यावर घालवायलाच हवी. दापोलीपासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर मुरुड गावाकडे जाताना डावीकडे कर्दे हा अतिशय निसर्गरम्य व सुरक्षित किनारा आहे.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड 

योग्य काळ - ऑक्टोबर ते मे

थंडीच्या मोसमात किनार्‍यावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना कॅमेऱ्यांत टिपण्याची छायाचित्रकारांसाठी ही एक सुवर्णसंधीच असते. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने पर्यटक `डॉल्फिन्स राईड` चा अनुभव घेऊ शकतात. समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी कर्देचा किनारा हा उत्तम व सुरक्षित पर्याय आहे.

सर्वसामान्य व्यक्तींना परवडतील अशा होमस्टेपासून ते स्वीमिंग पूल, लाऊंज अशा आधुनिक सुविधांनी युक्त अशा अनेक हॉटेल्सची सुविधा कर्देच्या समुद्रकिनाऱ्यावर उपलब्ध आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

गरम पाण्याची कुंड, तुरळ

चला तर मग!

गुहागर समुद्रकिनारा

चला तर मग!

बुधल सडा

चला तर मग!
Positive SSL