रत्नागिरीहून पावसमार्गे पूर्णगडच्या खाडीपुलावरून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस दाट सुरुबन दिसते. उंच उंच गेलेल्या सुरुच्या झाडांमधून दिसणारा निळाशार दर्या आणि चमकत्या लाटा आपल्याला थांबायला भाग पाडतात आणि पावले आपसूकच गावखडीच्या या सुंदर किनार्‍याकडे वळतात.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - रत्नागिरी

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - ऑक्टोबर ते मे

सुमारे एक किलोमीटर लांबीच्या गावखडीच्या किनार्‍यावरून उजवीकडे मुचकुंदी नदीच्या खाडीमुखावरील पूर्णग़ड किल्ल्याची तटबंदी दिसू शकते. सुरुच्या बनात कुटुंबासमवेत बसून दुपारचे भोजनही करता येऊ शकते. पावस-गावखडी हे अंतर ९ किलोमीटर आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

मत्स्यालय, रत्नागिरी

चला तर मग!

गोवळकोट उर्फ गोविंदगड, चिपळूण

चला तर मग!

पंखांवरचे भरारते जग

चला तर मग!
Positive SSL