रत्नागिरीपासून उत्तरेकडे गणपतीपुळे ४८ किमी अंतरावर आहे. गणपतीपुळेच्या उत्तरेस खाडी असून खाडीपलीकडे मालगुंड गाव आहे. भंडारपुळे हे गाव दक्षिणेस असून गणपतीपुळ्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - गणपतीपुळे

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - ऑक्टोबर ते मे

पूर्वेकडे नदी असून गणपतीपुळ्याच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाथी अनेक श्रध्दाळू भाविक इथे दरवर्षी येत असतात. त्याचप्रमाणे सुट्ट्यांमधे सहकुटुंब सहपरिवार इथे येणारे हौशी पर्यटकही खूप आहेत. श्रीग़णेशाच्या चरणी इथला समुद्र जणू अगणित लाटांची राशी अर्पण करत असतो. मंदिर तसे पूरातन असून त्याचा पेशवाईत जीर्णोध्दार झाला आहे. किनाऱ्यालगत असलेल्या महागणपतीच्या दर्शनाबरोबरच ईथला चंदेरी वाळूचा किनाराही पर्यटकांना खूणावत असतो. पांढर्याअशुभ्र, स्वच्छ किनार्याेवर समुद्रस्नानाचा आनंद इथे मनमुराद लूटता येतो. मात्र सर्व माहिती घेऊनच समुद्रात प्रवेश करणे कधीही उत्तम. मोकळा गार वारा अंगावर घेत या किनार्यानवर विविध साहसी क्रिडाप्रकार अनूभवता येतात.

आपल्याला येथिल किनाऱ्यावर आंबा, कोकम, आवळा, जांभूळ अश्या विविध चवदार कोकणी सरबतांची चवही चाखता येते.

जवळील प्रेक्षणीय स्थळे - केशवसुत स्मारक, जयगड, प्राचीन कोकण, वॅक्स म्युझियम, आरेवारे बीच, कोळीसरे मंदीर

गणपतीपुळ्याचा मंदिर परिसरही अतिशय हिरवागार आहे. संध्याकाळच्या संधिप्रकशात गणपतीपुळ्याच्या किनार्‍यावरील सुर्यास्त आपली कोकणाची सफर अविस्मरणिय बनवतो.

अनुभवण्यासारखे खूप काही

नाटेश्वर मंदीर – नाटे

चला तर मग!

जयगड, रत्नागिरी

चला तर मग!

खोरनिनको धबधबा, लांजा

चला तर मग!
Positive SSL