भौगोलिकरित्या रत्नागिरी जिल्हा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. रत्नागिरिची उत्तर सीमा म्हणजे बाणकोटची खाडी आणि दक्षिण सीमा म्हणजे वाघोटनची प्रशस्त खाडी. आणि याच्या मुखाशी आहेत रत्नागिरी मधील अतिशय अपरिचित, शांत आणि निवांत समुद्रकिनारे  म्हणजे बकाले व माडबन बीच.

तालुका - राजापूर

बस स्थानक - राजापूर

रेल्वे स्थानक - राजापूर

योग्य काळ - ऑक्टोबर ते मे

राजापूर तालुक्यातील जैतापूर पासून अगदी जवळ असलेल्या या किनाऱ्यांवर जायला अजून पक्का डांबरी रस्ता नसला तरी आपली गाडी असल्यास जांभ्याच्या या विस्तीर्ण पठारावरून बिनधास्त गाडी चालवत पठाराच्या पश्चिम टोकास यावे. तिथून दिसणारा नजारा डोळ्याचे पारणे फेडतो. ऐतिहासिक महत्व असलेली वाघोटन ची प्रशस्त खाडी आणि वास्तुरचनेचा उत्कृष्ट नमुना असलेला, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तर टोक असलेला विजयदुर्ग समोरच दिसतो.

हजारो - लाखो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून घडलेली इथली भौगोलीक रचना पाहून अचंबित व्हायला होते. रत्नागिरी जिल्ह्यातील ‘काही हटके’ पर्यटन स्थळांपैकी जान्शी जवळील बकाळे व माडबन बीचला भेट देणे हा एक वेगळाच अनुभव ठरतो.

अनुभवण्यासारखे खूप काही

अंजनवेल, गुहागर

चला तर मग!

निसर्ग पर्यटन

चला तर मग!

गोडवणे समुद्रकिनारा

चला तर मग!
Positive SSL