गणपतीपुळ्याहून रत्नागिरीकडे जाताना सुमारे १२ कि. मी. अंतरावर एक अतिशय चित्तवेधक निसर्गाविष्कार बघायला मिळतो. समुद्रात घुसलेल्या डोंगराच्या टोकामुळे निर्माण झालेले इथले दोन जुळे समुद्रकिनारे म्हणजे आरे आणि वारे. कोणाला किती सौंदर्य बहाल करायचं हा प्रश्न निसर्गालाही इथे पडला असावा.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - गणपतीपुळे

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - ऑक्टोबर ते मे 

नावाजलेल्या कोणत्याही सुंदर समुद्रकिनाऱ्यांच्या तोडीसतोड असे हे जुळे किनारे आहेत. इथे येणारे पर्यटक आरे-वारेच्या नितांत सुंदर, चंद्राकृती किनाऱ्यांच्या प्रेमात पडतात. इथून बघताना नजरेत न मावणारा अथांग सागर खूप शांत भासतो. आकाश निरभ्र असताना समुद्रावर निळाई पसरलेली असते. लाटा अवखळपणा न करता अलगद, एका लयीत किनाऱ्यावर येऊन शांत होत असतात. हे अनुभवताना आपल्या मनातील खळबळसुध्दा आत कुठेतरी शांत होत जाते.

सकाळी, दुपारी, संध्याकाळी अगदी कुठल्याही वेळी आरे-वारेच्या या घाटात थांबावं. जवळच्या खडकांवर बसून शहाळ्याच्या मधुर पाण्याचा आस्वाद घेत हा अविस्मरणीय नजारा डोळ्यांत साठवून घेऊन निवांत परतावं.

अनुभवण्यासारखे खूप काही

श्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर

चला तर मग!

प्रसिद्ध व्यक्ती

चला तर मग!

मंडणगड किल्ला, मंडणगड

चला तर मग!
Positive SSL