दापोलीच्या दक्षिणेस हर्णे गावाच्या अलीकडे वळसा घालून एक रस्ता डोंगरमाथ्यावरून आंजर्ले गावाच्या दिशेने जातो. डोंगरमाथा पार केल्याकेल्या स्तिमित करणाऱ्या विस्तीर्ण निसर्गचित्रांत आपला प्रवेश होतो.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - ऑक्टोबर ते मे

किनाऱ्याला खेटून उभ्या असलेल्या गच्च नारळी पोफळींच्या बागा, या उंच माडांमधून येणारे विविध पक्ष्यांचे आवाज, झाडीत लपलेली टुमदार कोकणी घरं आणि कानावर सतत येणारी समुद्राची गाज... अशा ठिकाणी मन हरवून जाईल नाहीतर काय?

आंजर्ल्याच्या किनार्‍याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या किनार्‍यावर न चुकता अंडी घालण्यासाठी येणार्‍या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या माद्या. अंड्यातून बाहेर पडलेल्या चिमुकल्या कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यासाठी इथे दरवर्षी अनेक पर्यटक त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांसह आवर्जून हजेरी लावतात. एखाद्या माहितीपटात अंड्यातून बाहेर पडलेली अंगठ्याएवढी चिमुकली कासवांची पिल्लं घाईघाईने पाण्याकडे धावतानाचा प्रसंग जरी आपण पाहिला असला तरी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याचा हा अनुभव खूप वेगळा, जिवंत व कायम लक्षात राहणारा असतो.

अनुभवण्यासारखे खूप काही

आंजर्ले समुद्रकिनारा

चला तर मग!

व्हॅली क्रॉसिंग

चला तर मग!

बाणकोट किल्ला, मंडणगड

चला तर मग!
Positive SSL