गणेशोत्सव जवळ आला की कोकणात सगळीकडे गडबड, लगबग सुरु होते. पुरुषमंडळी सजावटीसाठी खरेदी करण्यात मग्न असतात तर महिलावर्ग पक्वान्नांची तयारी करण्यात गुंतलेला असतो. परंतू लाडक्या गणेशाच्या आगमनाची पूर्तता गणेशमूर्तीकारांशिवाय कशी पूर्ण होणार? उत्सवाच्या खूप अगोदर गणेशभक्तांनी नेहेमीच्या मूर्तीशाळेत आपल्या मनासारख्या आवडत्या रूपातील गणेशमूर्तीची नोंदणी केलेली असते व त्यानुसार हे कुशल मूर्तीकार भक्तांच्या मनातील गणेशाला मूर्त रूपात साकारतात. 

मूर्तीकारांनी शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणरायाच्या मूर्त्या इतक्या जिवंत वाटतात की त्या पाहून नकळत हात जोडले जातात. अनेक पिढ्यांपासून श्रद्धेने केला जाणारा गणेशमूर्तीकलेचा हा व्यवसाय गणेशमूर्तीकारांना उत्पानाबरोबरच मानसिक समाधानही देऊन जातो.

अनुभवण्यासारखे खूप काही

गुहागर समुद्रकिनारा

चला तर मग!

आंजर्ले समुद्रकिनारा

चला तर मग!

धूतपापेश्वर मंदिर, राजापूर

चला तर मग!
Positive SSL